शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला जन्मठेप, टाडा कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:08 IST

प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टाडा न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष न्यायालयात रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या हत्येप्रकरणी यापूर्वीच विशेष न्यायालयाने, अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मोहम्मद मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई, दि. 12 - प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टाडा न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष न्यायालयात रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या हत्येप्रकरणी यापूर्वीच विशेष न्यायालयाने, अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मोहम्मद मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.पहिल्यांदा रियाज, अबू सालेम व हसन मेहेंदी यांच्यावरील खटला एकत्रितपणेच सुरू होता. परंतु सिद्दिकीने खरं उघड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर तसा जबाबही नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच त्याने जबाब मागे घेतल्यानं तो फितूर असल्याचे सरकारी वकिलांनी जाहीर केले. या कारणास्तव रियाजवर स्वतंत्रपणे खटला चालविण्यात आला होता.हे प्रकरण दुर्मीळ नसल्याने रियाजला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली होती. अखेर त्याला टाडा न्यायालयानं मान्यता दिली आहे. सिद्दिकीवर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने, या गुन्ह्यांतर्गत दोषीला फाशी किंवा जन्मठेप होऊ शकते म्हणून न्यायालयाने सिद्दिकीला त्याची बाजू मांडण्यास सांगितले होते.कोणी केली प्रदीप जैन यांची हत्या ? 1995मध्ये विकासक प्रदीप जैन यांची संपत्तीवरून हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी सिद्दीकीला दोषी ठरविताना, न्यायालयाने म्हटले की, अबू सालेम, मोहम्मद मेहेंदी हसन, सुभाष बिंद, शेखर कदम व दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस यांच्यासह रियाज सिद्दfकी विकासकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती, तसेच जैन भावंडांनी ‘कोल डोंगरी प्रापर्टी’वरील त्यांचे अधिकार सोडावेत, यासाठी ही हत्या करण्यात आली. त्यामुळे या लोकांना मोठा आर्थिक फायदा होणार होता. सरकारी वकिलांनी रियाज सिद्दfकीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले आहेत, तसेच जैन याच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचेही सरकारी वकिलांनी सिद्ध केले, असेही न्यायालयाने म्हटले.