शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एसीपींसह कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:14 IST

ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे, दि. 7 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार (२१, रा. कळवा, मनीषानगर) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने दोघांनाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुभद्राचे अमोलसमवेत लग्न ठरले होते. त्यामुळेच बुधवारी हे दोघे जेवणासाठी तिच्या कळवा, मनीषानगर येथील घरी एकत्र बसले असताना एसीपी निपुंगे यांचे तिच्या मोबाइलवर वारंवार फोन येत होते. वारंवार येणाºया फोनची चौकशी केल्यानंतर सारिकाने एसीपी निपुंगे यांच्याकडून होणाºया त्रासाची अमोल याला माहिती दिली. ‘तुझ्या ड्युटीची सेटिंग करून देतो, तू मला भेटायला ये’, असे ते सांगत असल्याचेही तिने त्याला सांगितले. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. काहीतरी वादही झाला. तिच्या आत्महत्येला एसीपींच्या मानसिक छळाबरोबरच अमोलच्या वादाचीही किनार असल्याचा जबाब तिचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार याने कळवा पोलिसांकडे रात्री उशिरा नोंदवला.याच जबाबाआधारे निपुंगे आणि फापाळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका कॉन्स्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी एसीपी दर्जाच्या अधिका-याविरुद्ध प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले एसीपी निपुंगे यांची आठच दिवसांपूर्वी भिवंडी वाहतूक विभागातून ठाणे मुख्यालयात बदली झाली होती. याप्रकरणी कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ अधिक तपास करत आहेत....आणि एसीपींनी पळ काढलासुभद्राने आत्महत्या केल्याची माहिती अमोल याच्याकडून तिचा भाऊ सुजित याला समजल्यानंतर तो तिच्या घरी आला. त्याच काळात दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिच्या फोनवर वारंवार फोन करणारे निपुंगे हेही तिथे आले होते. पण तिने आत्महत्या केल्याचे दृश्य त्यांनी पाहिल्यानंतर ते कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेले, अशीही माहिती कळवा पोलिसांना मिळाली.............................................वारंवार येणा-या फोनमुळे संशय वाढलासुभद्राला वारंवार निपुंगे यांचे फोन येत होते. एखादा वरिष्ठ अधिकारी महिला कॉन्स्टेबलला सलग इतक्या वेळा का फोन करतो, यातून अमोलच्या मनातही संशय वाढला. या फोननंतर त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. त्यानंतर त्याला एक फोन आला. तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर पडला. तोपर्यंत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.--------------------------‘‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एसीपींसह कॉन्स्टेबल असलेल्या सारिकाच्या भावी पतीविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सर्व बाजूंची सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर