शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही, वावोशी येथील सभेत खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 06:43 IST

Sambhaji Raje : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

वावोशी : मराठा आरक्षणासदर्भात समाज बांधवांनी रान उठवले होते. जवळपास ५८ मुक मोर्चे देखील काढले, मात्र  उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर लगेच सर्व सनमवयकाना एकत्र  करत राज्यात पुन्हा आरक्षणाची क्रांती उठविण्यासाठी संवाद यात्रा काढली आहे. सरकारच्या हातातून अजून ही वेळ गेली नसून जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नसल्याचा इशारा खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला आहे.

रायगड जिल्ह्यातून सुरु झालेल्या संवाद यात्रेतील वावोशी येथील सभेते ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या वेळी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केले तेच आता राज्य सरकार करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. मी भाजपच्या कोट्यातून झालेला खासदार आहे, म्हणून माझ्यावर भाजपाचा लेबल लावला आहे. 

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

मराठ्यांची उपेक्षाचवसतीगृहासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळातून  १ हजार कोटी द्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल, आरक्षणामध्ये बलिदान दिले त्यांच्या नातेवाईकाला नोकरी द्या, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, सारथी शिक्षण संस्थेला मदत करा, या सारख्या छोट्या मागण्या आहेत. त्यांचाही विचार सरकारकडून पूर्ण होत नसल्याने ही संवाद यात्रा काढल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण