शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकनंतर राज्यात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:32 IST

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. गावोगावी पेढे वाटून, रॅली काढून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भारतीय सैन्यदलाप्रति नागरिकांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. महानगरांमध्ये देशभक्ती गीतांचे गायन तसेच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते. नाशिकला वीरपत्नींनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेतील मुलांपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिक या जल्लोषात सहभागी झाले होते.

मुंबई/ठाणे/नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नागरिकांचा ‘हाय जोश’ पाहायला मिळाला. मुंबईत रेल्वे स्थानक परिसरात मिठाई वाटण्यात आली. संध्याकाळी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईत विविध पक्ष आणि संघटनांनी रॅली काढून जल्लोष केला. मुंब्रा येथे बाबा फकरूद्दीन शाह दर्ग्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिमांनी जवानांसाठी दुवा करत दर्ग्यात तिरंगा फडकवला.

कोकणात आनंदोत्सवरायगड जिल्ह्यात रोहा येथे शिवसैनिकांनी फटाके फोडले. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, राजापुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राजापुरात नागरिकांनी दुचाकी रॅलीही काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात नागरिक एकत्र आले होते.

बुलडाण्यात कारवाईबद्दल समाधानपुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. संपूर्ण जिल्हा शोकसागरात होता. मंगळवारच्या कारवाईनंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले. चिखली येथे भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शहीद जवान नितीन राठोड यांच्या चोरपांग्रा (गोवर्धननगर) गावी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करत फटाके फोडण्यात आले. वाशिम जिल्ह्यातही फटाके फोडण्यात आले.खान्देशात जल्लोषजळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नागरिकांनी जल्लोष केला. धुळ्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले. नंदुरबारमध्ये तिरंगा हातात घेऊन जल्लोष करण्यात आला. जळगाव विविध संस्था, युवकांनी वेगवेगळ्या चौकात जमा होऊन फटाके फोडले़राज्यात अ‍ॅलर्टपुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी वायूसेनेने बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला. हवाई हल्ल्यानंतर सतर्कता म्हणून राज्यातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार, मंगळवारीच याबाबत सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद ही संघटना भारताच्या विविध भागांत हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली. त्यात आजच्या प्रतिउत्तरानंतर, सुरक्षा यंत्रणांना अ‍ॅलर्ट राहण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने मंगळवारी सकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयातून राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संशयितांकडे कसून चौकशी करत, नाकाबंदीच्या सूचनेनंतर पोलिसांनी कडेकोट फौजफाटा तैनात केला आहे. अशात सोशल मीडियासह दहशतवादी संघटनांच्या सर्व हालचालींवर राज्य दहशतवाद विरोधी पथक लक्ष ठेवून आहे. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये श्वान पथकेही सर्व परिसर पिंजून काढत आहेत. तर महत्त्वाच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालत आहेत. या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने १९ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईल, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन इत्यादी उड्डाणावर बंदी आहे.

मराठवाड्यात जल्लोषऔरंगाबादला गुलमंडीवर मिठाई वाटण्यात आली. न्यायालय परिसरात वकिलांनीही जल्लोष केला. परभणीत सर्वधर्मीय समाज बांधवांनी जल्लोष केला. युवा सेनेने पेढे वाटले. महिला वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले. सराफ संघटनेने फटाके फोडले. नांदेडमध्ये नागरिकांनी पेढे वाटून ‘हाऊ इज द जोश़़. हाय है’ अशा घोषणा दिल्या़ उस्मानाबादला तरुणांनी फटाके फोडले. हिंगोलीत पेढे वाटण्यात आले. लातूर शहरासह जिल्ह्यात उदगीर, तांदुळजा आणि निटूर येथे नागरिकांनी जल्लोष केला.

सोलापुरात जल्लोषसोलापूरमध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष, संस्था, शाळा, महाविद्यालयांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवसेनेने नवी पेठेत मिठाई वाटली. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाने आतषबाजी केली.

कोल्हापूरला जिलेबी वाटपकोल्हापूरमध्ये नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष केला. बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा मोठा फलक लावला होता. सांगली, मिरजेसह जिल्हाभर जल्लोष करण्यात आला. साताºयात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.विदर्भात पेढे वाटले... नागपूरसह विदर्भात नागरिकांनी जल्लोष केला. नागपूर महानगरपालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज फडकावत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे दिले. पेढे वाटून जिल्ह्याजिल्ह्यांत आनंद साजरा करण्यात आला. पश्चिम वºहाडात राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी जल्लोष केला. अकोल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र