शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

कणकवलीत अचानक कोसळलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:17 IST

कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. तर मंगळवारी रात्री जोरदार कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले.

सिंधुदुर्ग, दि. 13 - कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. तर मंगळवारी रात्री जोरदार कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले.गेले काही दिवस दुपारी दोन वाजण्याचा मुहूर्त धरून कणकवली तालुक्यात पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही असाच पाऊस झाला होता. सायंकाळी उघडीप दिलेल्या पावसाने रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील मसुरकर किनई परिसरात उच्च विद्युत दाबामुळे काही लोकांच्या घरातील टीव्ही तसेच पंखे जळण्याची घटना घडली.कणकवली शहरातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने 21 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी रात्री बुवा अभिषेक शिरसाट व बुवा संदीप पूजारे यांचा डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला होता. मात्र, भजनाला सुरुवात होताच पावसाने जोर धरला. दोन तासांहून अधिक काळ हा पाऊस पडत होता. अचानक आलेल्या या पावसाने भजन रसिकांची तारांबळ उडवली. काही रसिकानी महामार्गा शेजारील दुकानांचा पावसापासून वाचण्यासाठी आधार घेतला. तर काही रसिकांनी जाग्यावरच उभे रहात प्लास्टिकच्या खुर्च्या डोक्यावर घेवून पावसा पासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. दोन तासाहून अधिक काळ पाऊस पड़त असल्याने शेवटी हा डबलबारी भजनाचा सामना रद्द करण्यात आला. बुवा अभिषेक शिरसाट यांनी परमहंस भालचंद्र महाराजावरील मालवणी भाषेतील गजर यावेळी सादर करून या कार्यक्रमाची सांगता केली. मंगळवारी रात्री जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस कोसळला . बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांतील पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.दोडामार्ग ८मिमी. (२७३५), सावंतवाडी १३ (३१२१.३), वेंगुर्ला ३.८ (२२०८.७), कुडाळ २७ (२४९७), मालवण ११ (१९०१.४), कणकवली ४२ (३१९८), देवगड ५८ (१९७३), वैभववाडी २०मिमी (२८९६मिमी) असा पाऊस झाला आहे.