शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

कार मुंबईची, चढणार रायगडमध्ये, उतरणार गोव्यात; कोकणवासीयांना ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:42 IST

रोरोचा फायदा नाही; कोकण रेल्वेचा नाकापेक्षा मोती जड

मुंबई : कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेरना या स्थानकांदरम्यान रोरो सेवा जाहीर केली आहे. या सेवेसाठी मुंबईतून वाहनाने कोलाडला जावे लागेल आाणि तेथून गाडी थेट गोव्याला उतरावी लागेल. ही सेवा मधील कोणत्याही स्थानकावर मिळणार नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही फायदा नसल्याचे स्पष्ट झाले. या सेवेऐवजी अतिरिक्त एक्स्प्रेस चालवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेत गाडी ट्रेनमध्ये लोड करण्यासाठी मुंबईमधून १०० किमी अंतर पार करत तीन तास आधी कोलाड स्टेशनवर पोहोचावे लागणार आहे, तर वेरनामध्ये उतरवण्यासाठी आणि तिथून कोकणात जाण्यासाठी कोकणवासीयांचा साधारण १० तास वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे या सेवेमुळे वेळेत कसे पोहोचता येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ही ट्रेन १२ तासांमध्ये गोव्यात पोहोचणार आहे.

भाडे परवडणारे नाहीचकुटुंबातील पाच सदस्यांचा कोकणापर्यंतचा कार प्रवास पाच ते सहा हजारांत होऊ शकतो. मात्र रो-रो सेवेचे भाडे ७,८७५ (जीएसटीसह) आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारसोबत जाणाऱ्यांनाही अतिरिक्त तिकीट काढून जावे लागणार आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड म्हणण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे.

...त्यापेक्षा एक्स्प्रेस वाढवाएका ट्रेनमधून ४० वाहने आणि १२० प्रवाशांचीच वाहतूक होणार आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान एक दिवस आड करून दहा दिवस ही सेवा चालविण्यात येणार आहे. म्हणजे ट्रेन फुल्ल झाली तरी या कालावधीत एकूण १२०० प्रवासीच त्यातून प्रवास करू शकतील. त्याऐवजी जर एक्स्प्रेस चालवली तर याच कालावधीत सुमारे ३२ हजार प्रवासी प्रवास करू शकले असते, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे सचिव अक्षय महापदी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही सेवा नसून एक फसवा प्रयोग असल्याची टीका करण्यात येत आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडgoaगोवा