शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

कोल्हापूरची प्रीती राज्य हॉकी संघाची कप्तान

By admin | Updated: November 25, 2014 00:08 IST

मुगळी (ता. गडहिंग्लज) गावाचे नाव झारखंड राज्यापर्यंत पोहोचले.

नूल : केवळ दहा गुंठे जमिनीत रक्ताचे पाणी करून राबणारे आई-वडील. परिस्थितीवर मात करून जिद्दीच्या जोरावर शिकणाऱ्या तीन मुली. यातील एका मुलीने हॉकी खेळाच्या जोरावर आटकेपार झेंडा फडकविला. महाराष्ट्राच्या शालेय हॉकी संघाची कर्णधार बनली आणि मुगळी (ता. गडहिंग्लज) गावाचे नाव झारखंड राज्यापर्यंत पोहोचले. प्रीती आण्णासाहेब माने हे या जिद्दी खेळाडूचे नाव आहे.मुगळी या छोट्याशा खेडेगावात आण्णासाहेब भीमा माने हे शेतमजुरी करतात, तर आई भारती गृहिणी आहेत. अश्विनी, प्रीती, स्वप्नाली या तीन मुली. प्रीती ही नूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. शाळेतील हॉकीचा इतर मुलींचा खेळ पाहून तिने हॉकीची स्टिक हातात धरली. चार किलोमीटरची पायपीट करून ती खेळाचा सराव करते. सेंटर फॉरवर्डला संघात खेळताना ती प्रतिस्पर्धी संघाच्या छातीत धडकी भरविते. तिच्याकडे चेंडू गेला की गोल नक्की ठरलेला. इतके नैप्युण्य तिने प्राप्त केले आहे. नैप्युण्य आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करीत तिची गतवर्षी शालेय गटातून महाराष्ट्र संघात निवड झाली.यावर्षी ती शालेय गटातून महाराष्ट्र संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. रांची (झारखंड) येथे या स्पर्धा सुरू आहेत. या निमित्ताने मुगळीचे नाव क्रीडा इतिहासाच्या नकाशावर आले आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने शाळेतील शिक्षक एस. जे. माने यांनी वेळावेळी तिला आर्थिक मदत केली आहे.आई-वडिलांच्या राबणुकीतून मिळणाऱ्या दुधाचे बिलदेखील मुलींच्या शिक्षणावर खर्च होत. अशा अवस्थेत प्रीतीची महाराष्ट्र हॉकी संघाच्या कर्णधारपदी झालेली निवड मुगळीकरांना भूषणावह ठरली आहे. तिला क्रीडाशिक्षक आर. ए. चौगुले, मनोहर मांगले, उदय पोवार यांचे मार्गदर्शन, तर प्राचार्य डी. एस. चव्हाण, पर्यवेक्षक टी. एम. राजाराम, जिमखाना प्रमुख एस. जे. माने यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)