शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:34 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात.

- अनिल कडू  अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात. दरम्यान आजमितीस मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत केवळ ५० वाघ आहेत. देशात सर्वप्रथम अस्तित्वात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधील एक आणि महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. जैविक विविधता व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनात मेळघाटचे योगदान सर्वाधिक आहे.मेळघाटात साग, ऐन, अर्जून, हलदु, बांबू या प्रमुख वृक्ष प्रजातींसह वृक्षाच्या ९०, झुडपांच्या ६६, तृणांच्या ३७६, वेलींच्या ५६, गवताच्या ९९ प्रजाती आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट, रानकुत्रे, तडस, रानगवे, सांबर, चितळ, भेडकी, चौसिंगा, अस्वल, मोर, सायळ, माकड यांचे सुद्धा वास्तव्य आहे. २६३ पेक्षा अधिक पक्षी, ९६ प्रकारचे मासे, ५४ प्रकारचे सरपटणारे प्राणी, उडती खार आणि रंग बदलणारा सरडा या मेळघाटच्या जमेच्या बाजू आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज ५० वाघांसह अत्यंत दुर्मिळ असलेला रानपिंगळाही मेळघाटात आहे. हा रानपिंगळा सर्वप्रथम १८७२ मध्ये जगासमोर आला. नंतर पुढे साधारणत: शंभर वर्षात रानपिंगळ्याचे कुठेच अस्तित्व आढळून आले नाही. रानपिंगळा जगातून नामशेष झाल्याचे बोलले जात असतानाच १९९७ ला मध्यप्रदेश, ओरीसा व महाराष्ट्रात त्याचे अस्तित्व दिसून आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत चौराकुंड क्षेत्रात फालतू नामक वनमजुराने त्यास हुडकून काढले आणि हा फालतू चक्क रानपिंगळ्याच्या प्रेमातच पडला. मेळघाटचे ऋतुमानानुसार बदलणारे नैसर्गिक सौंदर्य, येथील समृद्ध वन्यजीव संपदा, जैवविविधता आणि वन्यजीव बघण्याकरिता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे. यात विदेशी पर्यटकही ब-यापैकी आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे पर्यटकांची निराशा होत आहे. जंगल सफारीला पावसामुळे ब्रेक सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलात दाखल झालेले पर्यटक जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. जंगल सफारीचा पिपल पडावा ते अँगल नालापर्यंतचा रस्ता पावसामुळे, नाल्यांवरील पुलावर खड्डे पडल्यामुळे बंद पडला आहे. कुवापाटी-बुजरूकदोड-कोलकास दरम्यानचा जंगल सफारी मार्ग सुरू असला तरी तो केव्हाही बंद राहतो. या मार्गावर पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत नाही.  हमखास दिसणारे प्राणीही या पावसामुळे पर्यटकांच्या नजरेसमोर फिरकत नाहीत.

वन्यजीव सप्ताहयंदा वेगवेगळ्या उपक्रमांतर्गंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केल्या गेला. देशात दरवर्षी  २ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केल्या जायचा. पुढे १९८३ पासून हा सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर असा साजरा केला जातो. तर तत्कालिन पंत्प्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या दुरदर्शीपणातूनच वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यांच्याच प्रयत्नातूनच १ एप्रिल १९७३ ला भारतात व्याघ्र प्रकल्पाची योजना कार्यान्वित झाली.

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघMaharashtraमहाराष्ट्र