शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदारयादी सदोष

By admin | Updated: July 11, 2017 00:35 IST

पत्ता ढोबळपद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाला

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेली सात वॉर्डांची मतदारयादी सदोष असून अनेक ठिकाणी मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळपद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाला आहे. मतदारांचा संपूर्ण पत्ता लिहिण्याबाबत कॅन्टोन्मेंट निवडणूक नियमानुसार स्पष्ट सूचना असतानाही संपूर्ण पत्ता लिहिणे बहुतांश ठिकाणी टाळले असल्याचे दिसत आहे़ काही मतदारांचा पत्ता चक्क पुणे मुंबई रस्ता आणि दूरध्वनी केंद्र असा लिहिला आहे. तसेच सरकारी जागांवरील अतिक्रमितांची नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याबाबत रक्षा संपदा विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही बाजारपेठेतील काही अतिक्रमितांची नावे मतदारयादीत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने दरवर्षीप्रमाणे कॅन्टोन्मेंट निवडणूक नियम २००७ अनुसार एक जुलैला बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डाची वॉर्डनिहाय मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या मतदारयादीची पाहणी केली असता सातही प्रभागातील मतदारयादी सदोष असून, मतदारांच्या पत्त्यांत भरमसाठ चुका आहेत़ वॉर्डात विविध ठिकाणी व दूर अंतरावर राहत असूनही एकच पत्ता (गावाचा अगर परिसराचा) दिल्याचा तसेच काहींच्या नावापुढे पत्ताच नसल्याचा प्रताप काही प्रगणकांनी केला असल्याचे निदर्शनास आले आहे. वॉर्ड क्रमांक एकमधील शेलारवाडीचा काही भाग, इंद्रायणी दर्शन, शितळानगर काही भाग, थॉमस कॉलनी वॉर्ड दोनमधील बरलोटानगर, वॉर्ड पाचमधील आयुध निर्माणी वसाहत (देहूरोड) या भागाची मतदारयादी घर अगर सदनिका क्रमांक अचूक पत्त्यांसह व इमारतींच्या नावांसह व्यवस्थित बनविलेली दिसते. >बोगस मतदानाची शक्यतादेशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका २००८ सालापासून कॅन्टोन्मेंट निवडणुकांचे नियम २००७ अन्वये होत आहेत. या नियमान्वये बोर्डाला मतदारयादीचा नमुना देण्यात आलेला आहे. त्यानुसार कागदावर डाव्या कोपऱ्यात वॉर्ड क्रमांक, उजव्या बाजूला भाग क्रमाक लिहिणे आवश्यक आहे. मात्र बोर्डाच्या वॉर्ड निहाय मतदारयादीत काही ठिकाणी तसा उल्लेख केलेला दिसत नाही. तसेच मतदाराचा अनुक्रमांक, मतदाराचे नाव, वय, लिंग, अनु. जाती जमाती व पूर्ण पत्ता घर क्रमांकासह लिहिणे आवश्यक असताना अनेक मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ अगर अर्धवट दिला आहे. पत्त्यांच्या रकान्यात काही ठिकाणी फक्त गावांची नावे टाकली आहे. तर काही ठिकाणी परिसराचे नाव लिहिले आहे. परिसराचे नाव टाकताना भरमसाठ चुका केलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्ताच लिहिलेला नाही. नियमानुसार बंधनकारक असतानाही पत्त्यात घर क्रमांक लिहिणे जाणीवपूर्वक टाळले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बोर्ड हद्दीतील विविध भागांतील प्राथमिक मतदारयादीतील काही मतदार बोगस आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वॉर्ड क्रमांक एकमधील सव्वीस मतदारांची यादी सोबत जोडली आहे़ मात्र एकूण मतदारांत त्यांची गणना केलेली नाही.व्यवस्थित पत्ते असलेला भागवॉर्ड क्रमांक एक - शेलारवाडी काही भाग, इंद्रायणी दर्शन, शितळानगर काही भाग, थॉमस कॉलनी काही भाग वॉर्ड क्रमांक दोन - बरलोटानगर वॉर्ड क्रमांक पाच - देहूरोड येथील आयुध निमार्णी, निगडीतील सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, श्रीनगरी. या भागातील मतदार यादी बनविणाऱ्या प्रगणकांनी निवडणूक नियमाप्रमाणे काम केल्याचे दिसत आहे.काही वॉर्डांतील मृत मतदारयादीतघरोघरी जाऊन मतदारयादी तयार करण्याचे आदेश दिले असताना काही प्रगणकांनी योग्य पद्धतीने कामे न केल्याचे उघड झाले असून मामुर्डी गावातील तीन वर्षांपूर्वी मयत झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे नाव तसेच त्यांच्याच एका जवळच्या नात्यातील मुलीचे लग्न दोन वर्षांपूर्वी झालेले असताना तिचे नावापुढे चक्क मुलगा लिहून पुन्हा मतदारयादीत नाव दिसत असल्याची तक्रार एका जागरूक नागरिकाने मतदार यादी पाहणी करताना लोकमतकडे केलीे. सूचनांकडे प्रगणकांचे दुर्लक्ष झाल्याचे उघड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदारांचे पत्ते अचूक घेण्याबाबत मतदारयादी तयार करण्यापूर्वी बोर्ड कार्यालयात सर्व प्रगणकांची तत्कालीन कार्यालय अधीक्षक श्रीकांत लष्करे यांनी बैठक घेतली होती़ त्या वेळी बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रगणकांना मतदारांची नावे व पूर्ण पत्ते अचूक लिहिण्याबाबत सूचित केले होते़ मात्र या बैठकीचा काहीच उपयोग झाला नसल्याचे मतदारयादी पाहून स्पष्ट झाले आहे.सरकारी जागांवरील अतिक्रमितांची नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याबाबत रक्षा संपदा विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही बाजारपेठेतील एका भागातील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये समाविष्ट असणारी सर्व नावे घेण्यात आलेली नसताना बाजारपेठेतील काही भागांतील सरकारी जागांवरील अतिक्रमितांची नावे वॉर्ड क्रमांक पाचच्या मतदारयादीत समाविष्ट केल्याने संबंधित नावे वगळणेबाबतची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. यादीत ढोबळ, अर्धवट पत्ते असलेला भागवॉर्ड क्रमांक १ - कोटेश्वरवाडी काही भाग, माळवाडी, शेलारमळा, शेलारवाडी काही भाग, थॉमस कॉलनी काही भाग आदी. वॉर्ड क्र. २ - मामुर्डी काही भाग, शितळानगर काही भाग क्रमांक एक, दोन, गायकवाड वस्ती, राऊत वस्ती, मराठे वस्ती, जयसिंग चाळ आदी. वॉर्ड क्र. ४ - संकल्पनगरी, इंद्रप्रस्थ, लक्ष्मीपुरम आदी इमारतींची नावे आहेत. सदनिका अगर घर क्रमांक घेतलेले नाहीत. शंकर मंदिरमागे, पुणे मुंबई रस्ता, दूरध्वनी केंद्र असा पत्ता. वॉर्ड क्र. ५ - मेन बाजार देहूरोड भाग एक, दोन, वॉर्ड क्र. ६ - चिंचोलीतील भेगडे आळी, चाळ, बालघरे व जाधव आळी, जाधव चौक, पानसरे चाळ, गणेश सोसायटी, दाभाडे वाडा, दत्तनगर, समर्थनगरी, परमार कॉम्प्लेक्स, महामार्गावरील हॉटेल, आशीर्वाद कॉलनी आदी. वॉर्ड क्र. ७ - किन्हई काही भाग, झेंडेमळा, समर्थनगर, काळोखेमळा, हगवणे मळा, गार्डन सिटी, पोर्टर चाऴ