शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

१० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

By अमित महाबळ | Updated: August 30, 2023 19:09 IST

पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील प्रथम वर्ष पदविका, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. 

पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. त्यांना संस्थास्तरावर होणार असलेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर तयार केली जाणार आहे. संस्थेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागणार आहे.   

या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू

१० वी नंतरचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका आणि १२ वी नंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्था पातळीवरील जागांसाठी नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चित करणे ही प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ डेट) म्हणजेच दि. ८ सप्टेंबरपर्यंत आणि १२ वीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांसाठी दि. २० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.  

प्राचार्य म्हणतात...दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. हे प्रवेश नॉन कॅप अंतर्गत होणार असून, खासगी व शासकीय महाविद्यालयात संस्था पातळीवरील कौन्सिलिंग फेरीत विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. मात्र, त्यांना शासनाच्या आर्थिक सवलती देय नसतील, अशी माहिती जळगावचे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पराग पाटील यांनी दिली.

टॅग्स :ssc examदहावी