शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार भाजपचा, प्रचार राष्ट्रवादीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 01:04 IST

उमेदवार भाजपचा, पण फेसबुकवरील विविध अकाउंट आणि पेजेसवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, भाजप विरोधातील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

मुंबई : उमेदवार भाजपचा, पण फेसबुकवरील विविध अकाउंट आणि पेजेसवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, भाजप विरोधातील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुलाब्यातील भाजप उमेदवार राहुल नार्वेकर उमेदवारी जाहीर होईपर्यंत राष्ट्रवादीत होते. आता ते भाजपमध्ये असले, तरी त्यांचे फेसबुक अकाउंट, पेजेस अजून राष्ट्रवादीच्या घड्याळातच अडकले आहेत.

नार्वेकर यांच्या पेजवर भाजपवर निशाणा साधणाºया पोस्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आदी तसेच आहेत. नाही म्हणायला काही भाजप पदाधिकारी आपापल्या पेज, अकाउंटवर त्यांच्या प्रचाराचे फोटो टाकत आहेत़ नार्वेकर यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी फेसबुक, टिष्ट्वटरसह समाजमाध्यमांतून आक्रमक प्रचार चालविला आहे.

विविध सामाजिक कामातील सहभाग, आजवर घेतलेले कार्यक्रम आदींची माहिती देणारे छोट्या छोट्या चित्रफिती शेअर केल्या जात आहेत, तर प्रचारातील रोजचे फोटो घडामोडीही सोशल मीडियातून शेअर होत आहेत.

मुंबादेवीतील काँग्रेस उमेदवार अमिन पटेल आणि शिवसेना उमेदवार पांडुरंग सकपाळ या उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रचारसभांची माहिती, प्रचारातील ठळक फोटो टाकण्याचा सपाटा लावला आहे. याशिवाय, पटेल यांनी आमदारकीच्या काळातील लाभार्थ्यांचे व्हिडीओसुद्धा टाकले आहेत.मलबार हिलमधील भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा यांच्या डिजिटल प्रचारात आजवर त्यांनी केलेल्या कामांचे फोटो, चित्रफिती आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस