शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

एलबीटी त्वरित रद्द करा

By admin | Updated: December 16, 2014 01:13 IST

राज्यातील व्यापाऱ्यांचा एलबीटी विरोधातील रोष वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण त्यांची घोषणा ही

नागपूर : राज्यातील व्यापाऱ्यांचा एलबीटी विरोधातील रोष वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण त्यांची घोषणा ही घोषणाच ठरणार काय, असे संशयाचे वातावरण व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी सात दिवस उरले असताना, शासनातर्फे काहीही हालचाली होत नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.पर्यायी कर आकाराशासनाने घोषणा केल्यानुसार एलबीटी त्वरित रद्द करून पर्यायी कर आकारावा. कर भरण्यास व्यापाऱ्यांचा नकार नाही. पण इन्स्पेक्टरराज आणि क्षुल्लक कारणांवरून व्यापाऱ्यांवर टाकण्यात येणाऱ्या धाडीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. भाजपाने निवडणुकीच्या घोषणापत्रात नमूद केल्यानुसार सत्तेवर येताच एलबीटी रद्द करायला हवा होता. पण सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या घोषणेनुसार एलबीटी रद्द करण्यासाठी आता सात दिवस उरले आहेत. बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष,अखिल भारतीय व्यापारी महासंघ.एलबीटी रद्द होण्याचा विश्वासदिलेले आश्वासन सरकार पाळेल, असा विश्वास आहे. अधिवेशनात एलबीटी रद्द होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांशी लवकरच बोलणी करणार आहोत. तसे पाहता एलबीटी हा व्यापाऱ्यांसाठी घातकच आहे. व्यापारी त्रस्त आहेत. कमी कलेक्शनमुळे बहुतांश विकास कामे थांबली आहेत. अन्य राज्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास देशात महाराष्ट्र वगळता कुठेही एलबीटी नाही. त्यानंतरही तेथील विकास कामे वेगात सुरू आहेत. लगतच्या राज्यापासून बोध घेऊन सरकारने एलबीटी रद्द करावा. दीपेन अग्रवाल, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स.