शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 06:18 IST

पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याच्या आयसीएसईच्या निर्णयाला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा २ जुलै ते १४ जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएसई बोर्डाने काही दिवसांपूर्वीच घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. याबाबत बोर्डाकडे ई मेलने तक्रार केली. मात्र या मेलची बोर्डाने साधी दखलही घेतली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. व्यवसायाने वकील असलेले अरविंद तिवारी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. 

पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली. मात्र, आयसीएसई हे खासगी बोर्ड असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबत बोर्डाशीच चर्चा करावी, असे पंतप्रधान कार्यालयातून कळविण्यात आले. त्यामुळे न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे.

मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बोर्ड विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी व लवकर निकाल लावावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विलंब होणार नाही, त्यासाठी या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Educationशिक्षण