शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 20:57 IST

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. राज्यपाल पुढील काळात कोणते पाऊल उचलतात हे पहावे लागेल. त्यांच्यावर जबाबदारी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आकडा नाही. जनतेचा कौल पाहता भाजपाने पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करायला हवी होती. आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्यपाल प्रक्रिया सुरू करतील. बिगर भाजपा सरकार यावे ही कल्पना योग्य आहे मात्र ते कसे येणार यावर विचार केलेला नाही. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली, असे  थोरात म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे. आम्हाला भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचे आहे असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले असले तरीही विचार केलेला नाही असे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.  

मुख्यमंत्र्यांनी सरकारचा नाकर्तेपणा मान्य केला : पृथ्वीराज चव्हाणगेले 15 दिवस राज्यात अस्थिर परिस्थिती होती, ती संपली आहे. भाजपा सरकार बनवू शकणार नाही याची कबुली त्यांनी दिली आहे. राजीनामा देताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे म्हटले त्यावर बोलू. त्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. 220 जागा जिंकण्याची वल्गना फोल ठरली आहे. ते म्हणाले की गेली 4 वर्षे दुष्काळ पडला त्यावर उपाय करण्याऐवजी लाखो कोटींची बुलेट ट्रेन आणत कर्ज वाढवत आहेत. महाराष्ट्र कोलमडलेला असताना सरकार स्थापन करण्यास आणि मित्र पक्षांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. फडणवीस सरकारने 2 टक्केही कामे पूर्ण केलेली नाहीत. भाजपाने कितीही फोडाफोडी केली तरीही त्यांचे सरकार येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  राज्यपालांनी लवकरात लवकर राज्याला सरकार द्यावे. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. मुख्यमंत्री उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? असा घटनात्मक पेच आहे. यावरही राज्यपालांनी स्पष्टीकरण द्यावे, असे चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण