शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:27 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई/भंडारा : ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे खळबळजनक वक्तव्य केलेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. पटोले आपल्या मतदारसंघात  जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, मी का भांडतो. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.‘मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो’  जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरू नका. मी तुमच्यासोबत आहे. मोदीला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे, असे नाना पटोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  फडणवीसांचा हल्लाबोलविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट  करीत, ‘नानाभाऊ! केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक बौद्धिक उंचीही असावी लागते’ असा टोला हाणला. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांचा ताफा खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत आणि आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरविणारे संघटन? असा सवालही फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले