शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन राजकीय स्टंट वाटणे ही विकृतीच;महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 07:00 IST

Uddhav Thackeray: शिवसेना भवन येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, की महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, हा राजकीय बंद नाही.

मुंबई : बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली. या दुष्कृत्य आणि विकृती विरोधात उद्रेक उसळला, ते आंदोलन राजकीय स्टंट वाटणे म्हणजे विकृत मानसिकता आहे. हे विकृत नराधमांचे पाठीराखे आहेत, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

शिवसेना भवन येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, की महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, हा राजकीय बंद नाही. त्यामुळे सर्वांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. शाळेत मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही.

माझ्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असली पाहिजे. कोरोना काळात एखाद्या कुटुंबाप्रमाणे या विषाणूविरोधात लढलो होतो. तशीच वेळ आता पुन्हा आली असून या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांनी, माताभगिनींनी उत्स्फूर्तपणे बंद पाळावा, असेही ठाकरे म्हणाले.

हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागाबदलापूरमध्ये ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? राज्यभर या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये हात पसरून बसले होते. मुख्यमंत्र्यांनी हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागावे. बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असा आरोप होतोय. परंतु एखाद्या घटनेचा निषेध करणे राजकारण कधीपासून वाटायला लागले? निषेधही करायचा नाही का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे