शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधिमंडळाचे अधिवेशन बोलवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 17:51 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्रक दिले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये असलेल्या चिंताजनक परिस्थितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. तसेच इतर समाजांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करता आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने संमत करून संसदेकडे पाठवावा, त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवावे, असे एकमताने ठरले. दरम्यान, या ठरावाची प्रत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत या प्रस्तावास शिवसेनेचा विधानसभा, विधानपरिषद आणि संसदेमध्ये पूर्ण पाठिंबा असेल, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस