शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

By admin | Updated: September 11, 2015 23:40 IST

संवर्धन गरजेचे : कमजोर हृदयाला बळकटी देण्याचे काम

श्रीकांत चाळके - खेड --विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतरही काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत़ यात कडुनिंबासारखी वनस्पती अनेक शारीरिक कमजोरींवर गुणकारी आहे़ मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड सामान्य करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडूंग दुर्मिळ झाला आहे़ निवडूंगचे विविध गुण जोपासण्यात तसेच त्याचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडूंग आता मृत्यूपंथाला लागला आहे़सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात आपल्यावर रासायनिक फवारे मारलेली आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पिकवलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून लुप्त होत चालले आहे.़ हृदयाची दुर्बलता निवडूंग रसाने दूर होते़, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्यांमध्ये निवडूंग नजरेला पडत असे़ मात्र, येथील निवडुंगांना फळे येत नव्हती़ या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणात दिसणारा निवडूंग तसेच दोन दशके कोकणात फळरहीत आढळणारा निवडूंग आज दुर्मीळ झाला आहे.़ मराठवाडा विभागात डोंगरदऱ्यांतून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरिरातील धोकादायक आजारांवर होत आहे़ असे हे बहुगणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले निवडूंग दुर्मीळ होऊ लागले आहे. निवडूंंग उष्ण कटिबंध आणि ओसाड जंगल व दऱ्याखाऱ्यातून आढळते़ डोंगरदऱ्यातील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच बिडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खाऊन ते या रानमेव्याचा आस्वाद घेत. निवडुंगाच्या रस सेवनाने भुक वाढते. कफ विकारावरही हे गुणकारी आहे.़ सतत होणारा मूत्रविकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचा रस गुणकारी आहे़ या गुणकारी निवडुंगाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.बंजारा समाज व आदीवासी लोक निवडुंगाची बोंड आवडीने खातात़, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात़ या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़ शिशिर ऋतुत या झाडांना फळे येतात. फळांपासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे़ आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला असला तरी हे निवडूंग आता मृत्यूपंथाला लागले आहे़