शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विविध विभागांच्या गैरकारभारावर कॅगचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 03:15 IST

नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२0 कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले.

मुंबई : भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी सामान्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध विभागांच्या कामकाजाचे अनेक गंभीर निष्कर्ष आपल्या अहवालातून समोर आणले आहेत. यामुळे सरकारचे काही ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी विकासकांना अवाजवी फायदे झाले आहेत.महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम या दोन्ही विभागांनी शासकीय कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ६.७१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली शासकीय राज्यगृह इमारत पाच वर्षांपासून अधिक काळ विनावापर पडून राहिली. त्यामुळे मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध करून देण्याच्या योजनाच फोल ठरल्याचे कॅगने म्हटले आहे.नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२0 कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास योजनांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दिलेल्या चुकीच्या मंजुरीमुळे बिल्डरचा ८.६४ कोटीचा आर्थिक फायदा झाला. शिवाय ५९.७६ कोटींचे ९६0.४६ चौरस मीटर एवढे अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ बिल्डरने हस्तांतरीतच केले नाही.झाले आर्थिक नुकसानबिल्डरला वाटप केलेल्या संक्रमण गाळ्यांच्या भाडे व सेवाशुल्काच्या सुमार वसुलीविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे व पुनर्बांधणी केलेल्या गाळ्यांची विक्री करण्यासाठी विकासकाला दिलेली परवानगी काढून घेण्याची तसेच येणे असलेली रक्कम जमीन महसूल थकबाकी म्हणून वसूल करण्याची शिफारस लोकलेखा समितीने केली होती. ९८.९१ कोटी रकमेच्या वसुलीसाठी विकासकाविरुद्ध कारवाई करण्यात झालेल्या विलंबामुळे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे आर्थिक नुकसान झाले, असेही कॅगने म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र