शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गड्डा यात्रा सुधारित आराखड्यानुसारच

By admin | Updated: January 9, 2016 04:00 IST

सोलापूरमध्ये महिनाभर चालणाऱ्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आपत्कालीन व्यवस्थापन कृती आरखडा तयार केला. मात्र हा आरखडा बदलून मूळ आरखड्यानुसारच सर्व योजना करण्यात यावी

मुंबई : सोलापूरमध्ये महिनाभर चालणाऱ्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आपत्कालीन व्यवस्थापन कृती आरखडा तयार केला. मात्र हा आरखडा बदलून मूळ आरखड्यानुसारच सर्व योजना करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. शुक्रवारी ही याचिका फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांच्या कारभारात हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.सिद्धेश्वर गड्डा मंदिरालगतच असलेल्या पोलीस मैदानामधून जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन मार्ग ठेवला होता. तसेच वायुप्रदूषण होऊ नये यासाठी मैदानावर मॅट घालण्याचा आदेश सोलापूर नगर परिषद आणि सिद्धेश्वर गड्डा देवस्थानाला दिले होते. मात्र या दोन्हीविरोधात देवस्थान समितीने आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांनी आराखडा बदलण्यास नकार दिला. त्यामुळे सोलापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली होती.विभागीय आयुक्त, पुणे यांनी लक्ष घालून सोलापूर पोलीस आयुक्तांना बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यास सांगितले. पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत पोलीस मैदानाच्या बाजूला असलेला रस्ता आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून जाहीर केला. तसेच मॅटऐवजी सकाळ व संध्याकाळी मैदानावर पाणी मारून रोलर फिरवण्याचा मार्ग काढला. त्यामुळे मूळ आराखड्यामुळे निर्माण झालेला वाद शांत झाला. त्यानुसार मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात आला. या सुधारित आराखड्याला सोलापूरच्या महेश गाडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले.याचिकेनुसार, मूळ आराखड्यात आपत्कालीन स्थितीवेळी बाहेर पडण्यासाठी उपलब्ध केलेला मार्गच योग्य आहे. या मार्गावर खाद्यपदार्थांचे व अन्य वस्तूंचे स्टॉल उभारण्यात येतात. या स्टॉल्सना जागा देण्यासाठी देवस्थान समिती लिलाव करते आणि या लिलावातून देवस्थान समितीला आर्थिक फायदा होतो. मूळ आराखड्यामुळे देवस्थान समितीला नुकसान होईल. त्यामुळे देवस्थान समिती मूळ आराखड्याला विरोध करात आहे. सुधारित आराखड्याची अंमलबजावणी न करता मूळ आराखड्यानुसारच योजना आखावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. (प्रतिनिधी) कायदेशीर बाबींची पूर्ततामुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी याचिकाकर्त्यांच्या मागणीला आक्षेप घेतला. मूळ आराखड्यामुळे सोलापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यात आला आहे. मूळ आराखड्यानुसार यात्रा आयोजित करण्यात आली, तर पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे सुधारित आराखड्याचीच अंमलबजावणी केली जाईल, असे वग्यानी यांनी म्हटले.