कोराडी (नागपूर) : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे स्मार्ट फोन असून, ‘कॅशलेस’च्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले आहे. गेल्या दीड महिन्यात गावातील मोठे आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ झाले असून, याची टक्केवारी ९ आहे. यासाठी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस व चेक हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे. गावातील किरकोळ आर्थिक व्यवहार रोखीनेच केले जात आहेत. मात्र, तांत्रिक सुविधांअभावी त्यात अडचणी येत आहेत.गाव : गुमथीगावचे नाव : गुमथी, ता. कामठी, जि. नागपूरजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : १५ किलोमीटर.बॅँक/ पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : आहेएटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बस जात नाही, खासगी वाहने.वीजपुरवठा : वीजपुरवठा अखंडित.इंटरनेट सुविधा : आहे.कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : किरकोळ प्रमाणातपरंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी कॅशलेससाठी सकारात्मक आहे. - अंजली आशिष मोरे, उपसरपंच, गुमथी.गुमथी ग्रामपंचायत कार्यालयात वाय-फायच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटसेवा उपलब्ध आहे, परंतु कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट क्षमता वाढवावी, तसेच इंटरनेट सेवा मोफत द्यावी.- गौतम मानवटकर, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहार सोयीचे असले, तरी त्यासाठी लागणारी संसाधने व तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. गावातील लहान आर्थिक व्यवहार करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावामध्ये कॅशलेस व्यवहार त्रासदायक ठरत आहेत. - नलिनी ढोक, सरपंच, गुमथीगावातील भाजीविक्रेते, शेतमजूर, न्हावी, किराणा दुकानदार यांच्याशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रोख रकमेत करण्याची सवय पडली आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडले असले, तरी अनेकांना बँकिंग व्यवहार करण्याची सवय नाही. बँकिंग व्यवहाराची सवय नसल्याने कॅशलेसमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. - सुधाकर तकीत, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहारांमुळे तरुण मंडळी उत्साहित आहेत. कारण बहुतांश तरुण स्मार्ट फोनचा वापर मोठ्या करतात. त्यामुळे ते फोनवरून सहज आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी व शेतमजुरांना मात्र वेळेचा अभाव व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कॅशलेस व्यवहास करण्यात अडचणी येत आहेत.- विश्वेश्वर बोलधने, नागरिक, गुमथी.
‘कॅशलेस’ची क्रेझ
By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST