शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 13:20 IST

मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय.

विधानसभा निवडणुकीला आता अवघे ८-९ महिने राहिलेले असताना शिंदे सरकारमधील तीन तिघाडीमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. बच्चू कडूंसारख्या आमदारांनी तर आता आशाच सोडून दिली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार का रखडला यावर शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मोठा दावा केला आहे. 

मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाहीय. त्यातच ज्यांना मिळणार नाही त्यांचीही नाराजी सोसावी लागेल, या पेचामुळे हा विस्तार रखडलेला आहे. असे असताना संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचा दावा केला आहे.

जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

तसेच जयंत पाटलांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडेच थांबले आहेत. ते येणार होते म्हणूनच विस्तार थांबला होता, असा दावाही त्यांनी केला. संजय राऊतांवर टीका करताना शिरसाट यांनी त्यांना आता संध्याकाळी रेव्ह पार्टीला जाता येत नसेल, म्हणून ते अशी वक्तव्ये करत असतील असा टोला लगावला. तसेच राम मंदिर हा भाजपाचा कार्यक्रम नाही. सर्व पक्षाचे कारसेवक तिथे होते. सर्व देशवासियांचा राम मंदिर उभारणीत वाटा आहे, असेही शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारJayant Patilजयंत पाटील