शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गरजेपुरताच मंत्रिमंडळ विस्तार

By admin | Updated: November 23, 2014 01:51 IST

जुळवून घेण्याची तयारी भाजपा नेतृत्वाने दाखवली असली तरी, शिवसेना अडून बसल्याने फडणवीस सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळातील नावे पक्की होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

शिवसेना बसली अडून : नावे हातात, मात्र संख्येचा घोळ
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘रालोआ’च्या मजबुतीसाठी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची तयारी भाजपा नेतृत्वाने दाखवली असली तरी, शिवसेना अडून बसल्याने फडणवीस सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळातील नावे पक्की होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची गरज लक्षात घेऊन 25 तारखेनंतर छोटा विस्तार करण्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकमत झाल्याचे समजते.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी दिल्लीत आले होते.  मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड या विषयावर त्यांनी शहा यांच्याशी  दोनवेळा चर्चा केली. फडणवीस यांनी काही नावे पुढे केली. मात्र जोवर शिवसेनेच्या  मंत्रिपदांची संख्या ठरत नाही, तोवर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार करता येणार नाही, यावर उभयतांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रंनी सांगितले.   मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेने विरोधी पक्षात बसावे, अशी आमची कधीही इच्छा नव्हती.  दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे.  मंत्रिमंडळातील सध्या असलेल्या मंत्र्यांची संख्या  हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृह सांभाळण्यासाठी पुरेशी नाही, त्यामुळे सभागृह चालवण्यापुरता मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार करू. संख्या व नावांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.   शिवसेना का अडून बसली असे विचारता, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींशी आमची चर्चा सुरू असून, अजून किती दिवस थांबायचे, ते आजच सांगता येणार नाही. चांगल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत, असे ते म्हणाले.
 
च्रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली, मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रभू प्रथमच मुंबईत आले होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
 
उद्यार्पयत निर्णय होईल..
अपक्ष व बहुजन विकास आघाडीसह शेतकरी कामगार पक्षाने काही अटीवर पाठिंबा दिल्याने सभागृहात 137चा आकडा पार केलेला आहे. त्यात कॉँग्रेसचे 5 आमदार निलंबित असल्याने बहुमत सिद्ध करण्यात कोणतीच अडचण नाही. तरीही आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या सहभागाबाबत वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक चर्चा झालेली असून, उद्यार्पयत अंतिम निर्णय होईल, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे सांगितले.