शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप आजच होणार; शिवसेना आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 06:49 IST

विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असताना त्यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लटकला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटपही गुरुवारी जाहीर होऊ शकले नाही. त्यामुळे दोन्हींबाबतची अनिश्चितता कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेले चार दिवस खातेवाटप व विस्ताराची चर्चा सुरू आहे. गुरुवारीही वीसेएक मिनिटे हे नेते भेटले पण खातेवाटप जाहीर झाले नाही किंवा विस्तार कधी होणार हेही तिघांपैकी कोणीही सांगितले नाही. 

विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असताना त्यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. मात्र, त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. इच्छुकांनी गेले चारपाच दिवस मुंबईतच तळ ठोकला होता पण आता ते मतदारसंघात परतत आहेत. विस्तार केल्याशिवाय राष्ट्रवादीचे खातेवाटप करू नका या मागणीचा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धरला आहे. या गोंधळात खातेवाटप व विस्तार हे दोन्ही अडल्याचे म्हटले जाते. 

विलंब साहजिक : पटेलखातेवाटपाबाबत पहिले पाच दिवस तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नव्हती. गेले तीनचार दिवस ती सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती द्यायची म्हणजे कोणाची तरी काढावी लागतील. त्या बाबत काय करायचे हे सगळे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच खातेवाटप व विस्ताराचाही निर्णय होईल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितले.

आजच विस्तार : शिरसाट शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप शुक्रवारी (१४ जुलै) होईल असा दावा केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार