शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीत घेणार लोकायुक्ताबाबत निर्णय; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:15 IST

अण्णा हजारे उपोषणावर ठाम

राळेगणसिद्धी : राज्यात लोकायुक्त कायदा करण्याबाबतची निवड समिती २९ तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत गठीत केली जाईल, असे लेखी आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन या दोघांनीही शुक्रवारी अण्णा हजारे यांची मनधरणी केली. मात्र, त्यानंतरही हजारे उपोषणावर ठाम आहेत. लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत मोदी व फडणवीस सरकार वेळकाढूपणा करत आहे, असे हजारे यांचे म्हणणे आहे.लोकपाल व लोकायुक्त कायदे, तसेच स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी याबाबत हजारे ३० तारखेपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरु करणार आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी सरकारचे दूत म्हणून महाजन शुक्रवारी दुसऱ्यांदा राळेगणमध्ये आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लेखी पत्र हजारे यांना दिले. तसेच मुख्यमंत्री व हजारे यांच्यात दूरध्वनीवर संवादही घडविला. २९ तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त कायद्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. त्यानंतर पुढील महिन्यात होणाºया अधिवेशनात लोकायुक्त कायदा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही महाजन यांनी अण्णांना देण्याचा प्रयत्न केला. लोकपालची अंमलबजावणी हा केंद्राचा विषय आहे. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने तोही प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासनही महाजन यांनी यावेळी अण्णा हजारे यांना सांगितले. मात्र, या आश्वासनाने हजारे यांचे समाधान झालेले नाही.२०१३ मध्ये लोकपालचा कायदा झाला. त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आले. पाच वर्षात या सरकारने काहीच केले नाही. फडणवीसांनीही राज्यात गत चार वर्षे लोकायुक्त कायदा केला नाही. त्यामुळे आपला सरकारवर विश्वास नसून ३० तारखेपासून ठरल्याप्रमाणे आंदोलन होईल, असे हजारे यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. त्यामुळे महाजन यांची दुसरी शिष्टाईही निष्फळ ठरली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसanna hazareअण्णा हजारे