शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पाच्या २० हजार कोटी खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:02 IST

जलमंडळ (मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली) व जलपरिषद (मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली) यांची एकही बैठक झालेली नव्हती. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक जलआराखड्याबाबत घेण्यात आली.

मुंबई : राज्यात असलेल्या प्रमुख पाच नद्या व त्यांची उपखोरे यांचा एकत्रित जलआराखडा तयार करण्याची कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण २००५च्या कलम १५ व १६ अन्वये बंधनकारक असतानादेखील २००५ ते २०१४ या कालावधीत जलआराखडे तयार करण्यासाठी कायद्याने स्थापित केलेल्या जलमंडळ (मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली) व जलपरिषद (मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली) यांची एकही बैठक झालेली नव्हती. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक जलआराखड्याबाबत घेण्यात आली. त्यामुळे गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्चिम वाहिनी या पाचही प्रमुख नद्यांचे खोरेनिहाय जलआराखडे देशात पहिल्यांदा महाराष्टÑाने तयार केले. या जलआराखड्यांमुळे खोऱ्यांचे वर्गीकरण अतिविपुलतेचे, विपुलतेचे, सर्वसाधारण, तुटीचे व अतितुटीचे अशा प्रकारे करता आले.त्यामुळे अतिविपुलतेच्या खोºयातील पाणी तुटीच्या व अतितुटीच्या खोºयात वळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी नदीजोड योजना राज्यशासनाने हाती घेतलेली आहे, ही माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.या नदीजोड प्रकल्पामध्ये नार-पार-गिरना, पार-गोदावरी, दमगणगंंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या उत्तर महाराष्टÑ व मराठवाड्यासाठी तर वैनगंगा-नळगंगा ही पश्चिम विदर्भासाठी वरदायी ठरणार आहेत. हा नदीजोड प्रकल्प पुढील ३ वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेला आहे. अतिविपुलतेच्या खोºयातील स्थानिक गरजा भागवून अतिरिक्त पाणी जे समुद्राला जाऊन वाया जाणार होते, असेच पाणी वळविले जाईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर अन्याय होण्याचा विषय उरणार नाही.>या पाच प्रकल्पांचा होणार समावेशनार-पार-गिरना, पार-गोदावरी, दमणगंंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या चार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी. वैनगंगा-नळगंगा या पश्चिम विदर्भासाठी वरदायी ठरणाºया प्रकल्पासाठी ५ हजार कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.या नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता नदीजोड प्रकल्प असे नवीन पद निर्माण व उच्चस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची ही स्थापना.