शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सी-मेट ला पॉलीमर स्वॅब निर्मितीत यश ; कोरोना तपासणीला उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 20:32 IST

कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमूना घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलीमर स्लॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे.

ठळक मुद्देचाचणीसाठी पाठवले बेंगलोरला

राहुल शिंदे - 

पुणे: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर घातलेले थैमान व कोरोना बाधितांचा देशातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेतल्यास याबाबत संशोधन करण्याची आवश्यकता आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचामधील ( टेस्टिंग कीट) अत्यंत महत्वाच्या 'पॉलीमर स्वॅब' ची निर्मिती करण्यात पुण्यातील सेंटर फॉर मेटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)  मधील संशोधकांना यश आले आहे.

कोरोना तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचाची निर्मिती भारतात होत नाही.भारताला इतर देशांमधून त्याची आयात करावी लागते.जगभरात लोकडाऊन असल्याने आयात -निर्यात थाबली आहे.त्यामुळे तपासणी संचाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यावर उपाय म्हणून देशातील शास्त्रज्ञ  व डॉक्टर स्वदेशी बनावटीच्या तपासणी संचाची निर्मिती करण्यात व्यस्त आहेत.त्याच पार्श्वभूमीवर सी-मेट मधील वरिष्ठ पॉलीमर शास्त्रज्ञ व या संशोधनामधील प्रमुख डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी वैशिष्टपूर्ण पॉलिमरचा वापर करून तपासणी संचामधील महत्वाचा पॉलीमर स्वॅब विकसित केला आहे.तसेच त्याची चाचणी घेण्यासाठी बंगलोर येथे पाठविला आहे.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,कोरोना तपासणी संचाची आयात प्रामुख्याने जर्मनी इटली आणि अमेरिकेतून केली जाते.कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमूना घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलीमर स्वॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे.त्यामुळे आम्ही या स्लॅबची निर्मिती केली आहे.स्वदेशी बनावटीच्या व केंद्र शासनाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या निर्देशानुसार कृत्रिम व वैशिष्टपूर्ण पॉलीमर स्वॅब पुढील चाचणी करिता बेंगलोरला पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आपल्याला नजीकच्या काळात सुमारे  40 लाख स्लॅबची आवश्यकता आहे. तसेच सी-मेट मध्ये थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने किफातशीर पॉलीमर स्लॅब विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

---------

पॉलीमर स्वॅब निर्मिती संशोधन कार्यात बेंगलोर येथील रंगादुराई मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. के.एल.श्रीधर,डॉ.एल.ज्योतिष कुमार,बंगलोर येथील ॲडिव्हीट मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी ऑफ इंडिया (एएमएस आय) यांचा सहभाग आहे.- भारत काळे, संचालक, सी- मेट ,पुणे

------

कोरोना तपासणी संचाच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण व्हावा; यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.वैद्यकीय चाचण्यानंतर लवकरच पॉलीमर स्लबचे उत्पादन घेणे शक्य होईल.- डॉ. मुनिरत्नम,महासंचालक, सी- मेट

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयResearchसंशोधन