शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेर मुंबई होणार शंभर टक्के अनलॉक, या आठवड्यात मुंबईकरांचे १०० टक्के लसीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:22 IST

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे.

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दररोजची रुग्ण संख्याही पाचशेहून कमी असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत. पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक होईल, असे संकेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत शंभर टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा ऑफलाईनही... ऑनलाईनही !- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती करू नका. परीक्षेसाठी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचना मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना केली. - यामुळे अजूनही ऑनलाइन शिक्षणालाच पसंती देणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे परिपत्रक मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी शाळांना पाठवले आहे. 

शनिवार- रविवारीही शाळा सुरू ठेवा - उपमुख्यमंत्री -कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत. हे नुकसान भरून निघाले पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आधीच सततच्या सुट्ट्यांमुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. आता पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी कशाला? त्यापेक्षा मुलांना शिकवा व झालेले नुकसान भरून काढा. कोरोनामुळे राज्यातील ऑनलाइन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला.  पण, प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाइनमध्ये येत नाही. त्यामुळे शाळा ऑफलाइन पद्धतीने भरवण्यावर त्यांनी भर दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस