शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 15:34 IST

अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

मुंबई - देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे झगमगाट आहे. पणतीच्या दिव्यांनी उजळणारं अंगण आता इलेक्ट्रीक्सच्या लायटींगने उजळून निघत आहे. सगळीकडे इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढला आहे. त्यामुळे, साहजिकच घरातील लाईट बिलावरही त्याचा परिणाम होत असून वीज वितरण कंपन्यांचाही लोड वाढत आहेत. त्यातूनच अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

माणसाला प्रत्येक वस्तू सहज आणि एका क्लिकवर, एका बटणावर सुरू झालेली हवी आहे. त्यामुळेच, पंखा, एसी, मिक्सर, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, गाडी, वॉशिंग मशिन्स, बॅटरी, फ्रीज, ओव्हन सगळं काही इलेक्ट्रॉनिक्सवर आधारीत आहे. या सर्व उपकरणांसाठी गरज असते ती लाईट म्हणजेच वीजेची. अगदी सकाळच्या पाणी तापवण्याच्या हीटरपासून ते गुडनाईट म्हणणाऱ्या लिक्वीडपर्यंत सर्वकाही उपकरणे वीजेवरच चालतात. या उपकरणांच्या वापरामुळे आपल्या घरातील लाईटचे बीलही जास्त येत. तर, कंपन्यांवरही वीजेचा अतिरीक्त भार पडतो. त्यामुळेच, कोरोना कालावधीत लाईट बिलावरुन मोठी समस्या निर्माण झाली होती.  कोरोना कालवधी अनेकांच्या घरातील लाईटचं बील वाढीव आल्याने महावितरणविरोधात अनेकांनी मोर्चे काढले होते. तर, काहींनी महावितरणच्या कार्यालयांना टाळेही ठोकले होते. त्यामुळेच, वीजेची बचत हाच बिल कमी येण्याचा पर्यायी मार्ग आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ''स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची "ऊर्जा बचत क्षमता" जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा'', असे आवाहन एमएसईबीने केले आहे.  

टॅग्स :electricityवीजMumbaiमुंबई