शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"...पण साहेब मनातून तुम्ही आमच्या भूमिकेला नक्कीच पाठिंबा देत असाल," एकनाथ शिंदेनी ट्विट केला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 21:44 IST

"आम्हाला बंडखोर म्हणू नका हो. तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. बघा आम्ही लढाई कशी लढतो ते. एवढीच अपेक्षा आहे."

शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आपल्याला तब्बल 46 आमदारांचा पाठींबा असल्याचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी शिंदे गटाची मुख्य मागणी आहे. यातच आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी ट्विट केला आहे. या व्हिडिओत शिरसाट आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून  शिरसाट म्हणत आहेत, "हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले आपल्याला सांभाळणार आहेत? शक्य नाही साहेब. आमची भूमिका आज कदाचित तुम्हाला पटत नसेल, पण साहेब मनातून तुम्ही या भूमिकेला निश्चितच पाठिंबा देत असाल. ही माझी खात्री आहे. म्हणूनच आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाललो आहोत. त्यामागची भूमिकाच ही आहे, की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय."

तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या -"ज्या हिंदूत्वाच्या विचाराने शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उभे केले होते, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी लढायला आम्हाला शिवसेना प्रमुखांनी उभे केले होते. ती भूमिका आता आम्हाला वठवायची आहे. साहेब तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आम्हाला बंडखोर म्हणू नका हो. तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. बघा आम्ही लढाई कशी लढतो ते. एवढीच अपेक्षा आहे."

आम्हाला रामलल्लाचं दर्शन का नाही -हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले, तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका, असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवलात? आम्हाला रामलल्लांचे दर्शन का घेऊ दिले नाही? असेही शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना