शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: July 18, 2014 00:58 IST

तोतया पोलीस बनून व्यापाऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पथक यशस्वी झाले आहे. पोलिसांनी टोळीच्या मास्टर मार्इंडसह

एलसीबीची कारवाई : मास्टर मार्इंडसह ११ आरोपींना अटक अमरावती : तोतया पोलीस बनून व्यापाऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पथक यशस्वी झाले आहे. पोलिसांनी टोळीच्या मास्टर मार्इंडसह अकरा आरोपींना अटक केली आहे. शिवराम सोनबावने (४४,रा. सोनेगाव खर्डा, ता. धामणगाव रेल्वे), रघुनाथ आनंद इंगळे (५५,रा. गांधीनगर , पुलगाव), किशोर हरीदास शंभरकर (३२,रा. हिंगणघाट फैल, पुलगाव ), नरेश हरीदास शंभरकर (३०,रा. धामणगाव रेल्वे), संजय सुरेश गावंडे (२९,रा. तळेगाव दशासर), मनोज महादेव वानखडे (२५,रा. आजनगाव, धामणगाव रेल्वे), भुषण चेंडकापुरे (१९, रा. यशोदा नगर) सुमीत दत्तुपंत आठवले (४४,रा. संजय गांधी नगर), अंशुल अशोक डोंगरे (२२,रा.गणेशनगर), प्रदीप शंकर गायकवाड (३३,रा. शिरजगाव कसबा), माणिक शंकर आठवले (५०, रा. सावरखेड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.पुलगाव येथील रहिवासी शेख रऊफ हे भांड्याचे व्यापारी व पाणीपुरवठा संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे रघुनाथ इंगळे हा कारकून होता. त्यामुळे या दोघांचे विश्वासाचे संबंध होते. सोमवारी आरोपी किशोर शंभरकरने इंगळे याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. सुमित आठवले व नरेश शंभरकर यांच्याकडे हवाल्याची मोठी रक्कम आहे. ही रक्कम बाजारात आणणे कठीण असल्यामुळे ते तीन लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देत असल्याची माहिती त्याने इंगळेला दिली.त्यावर विश्वास बसावा म्हणून किशोरने शेख रऊफ व इंगळे यांना शंभर रुपयाच्या नोटांचे एक बंडल आणून दाखविले होते. खात्री पटल्यानंतर रऊफकडून २ लाख रुपये घेऊन त्यामध्ये पैसे दुप्पट करण्यासाठी शंभरकरने ९० हजार रुपयांची रोकड टाकली. त्यानंतर रघुनाथ , रऊफ व किशोर हे दोघे दोन दुचाकीने राजुरवाडी गावात पोहचले. तेथे टोळीचा मास्टर मार्इंड शिवराम सोनबावने हा विशाल नावाने एजंट बनून आला. रऊफ याच्याकडील २ लाख ९० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेतली. त्यानंतर शेख रऊफ यांना घेऊन शिवराम हा दुचाकीने तिवसा येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यांच्यामागे काही अंतरावर रघुनाथ व किशोर हे दोघे दुचाकीने निघाले होते. ठरल्याप्रमाणे राजुरवाडी- तिवसा मार्गावर पोहोचताच त्यांच्या मागून एका टाटा सुमो गाडीत पोलिसांचा पोषाख घातलेले अंशुल डोंगरे, सुमीत आठवले, नरेश शंभरकर, संजय गावंडे, मनोज वानखडे, प्रदीप गायकवाड, माणिक आठवले व भूषण चेंडकापुरे हे आले. त्यांनी रऊफ यांची दुचाकी अडविली. पोलीस असल्याचा देखावा करुन त्यांनी मास्टर माइंड सोनबावने याला रऊफ यांच्यासमोर मारहाण करुन गाडीत बसविले. त्यानंतर पैशाची बॅग घेऊन आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे रऊफ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुध्द फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वानखडे, चित्तरंजन चांदुरे, नागेश चतुरकर, अरुण मेटे, गुलचंद भांबुरकर, त्र्यंबक मनोहरे, सचिन मिश्रा, अनिल वासनिक, प्रवीण देशमुख, शकील चव्हाण, अमित वानखडे यांनी केली. (प्रतिनिधी)