शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सर्व प्रकारच्या परवानग्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:09 IST

राज्यात नवीन सरकार येताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट निघाला आहे.

मुंबई : राज्यात नवीन सरकार येताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट निघाला आहे. या बुलेट ट्रेनसाठी आतापर्यंत अडलेल्या सर्व परवानग्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती पत्रपरिषदेत दिली. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे-फडणवीस यांची संयुक्त पत्रपरिषद झाली. त्यावेळी, बुलेट ट्रेनसाठीची कोणतीही परवानगी आता शिल्लक राहिलेली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. या परवानग्या भूसंपादन आणि पर्यावरणाशी संबंधित होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या बुलेट ट्रेनवरून केंद्र-राज्य संघर्ष आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बघायला मिळाला होता. बुलेट ट्रेन हे मुंबईचे लचके तोडण्यासाठीचे षडयंत्र असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सातत्याने केली होती. आता मात्र शिंदे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित विषयांना मंजुरी दिली आहे.

बीकेसीतील ज्या भूखंडावर सद्यस्थितीत पालिकेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे त्या जागेचा ताबा मिळाल्याशिवाय बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात होऊ शकणार नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता बीकेसीतील भूखंड  नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात राज्य सरकार, एमएमआरडीए आणि कॉर्पोरेशनमध्ये बैठका सुरू आहेत. हा भूखंड लवकर हस्तांरित करण्यासाठी एमएमआरडीएकडून पावले उचलली जात आहेत. 

भूसंपादनाचे ९१ टक्के काम पूर्णबुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेली पालघर येथील १.२ हेक्टर जागा गेल्याच आठवड्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात गुजरातमधील ९८.८, दादरा नगर हवेलीतील ९०.५६ तर महाराष्ट्रातील ७२.२५ टक्के कामाचा समावेश आहे. १२ जुलै रोजी झालेल्या एका आढावा बैठकीत बीकेसीतील भूमिगत स्थानकासाठी ४.८४ हेक्टर तर विक्रोळीत बोगद्यासाठीची ३.९२ हेक्टर जागा सप्टेंबरपर्यंत हस्तांतरित करण्याचे ठरले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBullet Trainबुलेट ट्रेनMaharashtraमहाराष्ट्र