शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस-वेविरोधात एल्गार, महाराष्ट्र, गुजरातच्या शेतक-यांचे एकत्रित आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:43 IST

हितेन नाईक पालघर : मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस-वे, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, एमएमआरडीए विकास आराखडा आदी शेतकरी, आदिवासी व मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारे विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाहीत. राज्यपालांनी या प्रकल्पांच्या भू-संपादनासाठी काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी भूमिपुत्र बचाव आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हजारो भूमिपुत्रांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

हितेन नाईक पालघर : मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस-वे, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, एमएमआरडीए विकास आराखडा आदी शेतकरी, आदिवासी व मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारे विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाहीत. राज्यपालांनी या प्रकल्पांच्या भू-संपादनासाठी काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी भूमिपुत्र बचाव आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हजारो भूमिपुत्रांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चातमहाराष्ट्रासह गुजरातमधील शेतकरी सहभागी झाले.महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाºया बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस-वे आदी प्रकल्पांचा फटका महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या उद्ध्वस्त करणाºया प्रकल्पांविरोधात दोन्ही राज्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी एकत्रयेऊन अस्तित्वाचा लढा देण्यास सज्ज राहावे, असे आवाहन गुजरातमधील खेडूत समाज संघटनेचे अध्यक्ष जयेशभाई पटेल यांनी मोर्चातसहभागी झालेल्या आंदोलकांना मार्गदर्शन करताना केले. आज या मोर्चाच्या रूपाने ठिणगी पडली असून, लवकरच याचे वणव्यात रूपांतर होईल, असा विश्वास शेतकरी संघटनेचे संतोष पावडे यांनी व्यक्त केला.‘ना विधानसभा, ना लोकसभा, सबके उपर ग्रामसभा’ अशा घोषणा देत ग्रामसभेचे अधिकार रद्द करणाºया राज्यपालांच्या अध्यादेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलावे आणि आमचे अधिकार आम्हाला पूर्ववत मिळवून द्यावे, असे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले.या वेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कुणबी सेनेचे जितू राऊळ, पौर्णिमा मेहेर आदींनी आपले विचार मांडले.या मोर्चात भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती, सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, खेडूत समाज (गुजरात), पर्यावरण संवर्धन समिती आदी १७ संघटना सहभागी झाल्या होत्या.>ही आमच्या अस्तित्वाची लढाईजनतेच्या पैशातून वाढवण बंदराचे बेकायदेशीररीत्या सर्वेक्षण केले जात असून, मच्छीमार, शेतकरी यांना देशोधडीला लावणाºया या बंदराच्या विरोधात एकजुटीनेलढा देऊ, असे अभामास परिषदेचे वैभव वझे यांनी सांगितले. एका ठिकाणी आम्हाला पेसाच्या कायद्यान्वये संरक्षक अधिकार दिले.दुसरीकडे हे विनाशकारी प्रकल्प राबविताना त्याची अडचण भासू लागल्याने, राज्यपालांना असलेल्याविशेष अधिकाराचा फायदा घेऊन आमचे अधिकारच संपुष्टात आणले. अशा स्वार्थी सरकारवर आमचा काडीचाही विश्वास नसून, आमची अस्तित्वाची लढाई आम्ही गावापाड्यांतून लढविणार असल्याचे आदिवासी नेते दत्ता करबट यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलन