शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

Samruddhi Mahamarg: मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 8:39 AM

Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उदघटनाआधीच विघ्नांची मालिका सुरू झाली आहे.

Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उदघटनाआधीच विघ्नांची मालिका सुरू झाली आहे. उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज-७ मधील सिंदखेडराजा जवळ आणखी एक दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा गर्डर खाली कोसळला. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. दुर्घटनेत एक ट्रेलर गर्डर खाली येऊन मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. 

जवळपास २०० टन वजनाचा गर्डर तब्बल ८० फूटाहून खाली कोसळला. यातूनच या दुर्घटनेची भीषणता लक्षात येते. निर्माणाधीन पूल जवळपास ५०० मीटर लांबीचा असून ८० फूट उंच आहे. दुर्घटनेवेळी कोणताही कामगार गर्डरखाली नव्हता त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. गेल्या तीन दिवसात समृद्धी महामार्गावरील पूल कोसळल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत आहेत का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. 

१६ व्या क्रमांकाचा ओव्हरपास कोसळलाहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी होणार होते. पण या महामार्गावरील सोळाव्या क्रमांकाचा ओव्हरपास आर्च कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. यामुळे नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची हवाई पाहणीही केली होती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरbuldhanaबुलडाणा