शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

दूध उत्पादन प्रकल्प उभारणीत बुलडाणा जिल्ह्याचा समावेश

By admin | Published: January 22, 2017 8:06 PM

दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत/ब्रह्मानंद जाधवबुलडाणा, दि. 22 - दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये  राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या २१ सहकारी दूध संस्थांमध्ये सरासरी ६ हजार ३६१  प्रति. दिन लिटर दूध गोळा गेले जात असून, या प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्यातीलदूध उत्पादनात वाढ होणार आहे.दूधाळ जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई, दूधाळ जनावरांचे कमी होत असलेली संख्या व पशुपालकांना मार्गदर्शनाचा आभाव यासरख्या अनेक समस्यांमुळे दूध उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे.  बुलडाणा जिल्ह्यात एकूण ५६५ सहकारी दूधसंस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. परंतू सध्या यापैकी केवळ २१ संस्था सुरू आहे. तर ३८ संस्था सद्यस्थिीत बंद आहे. तर कायदेशीरबाबींच्या पूर्ततेअभावी ५०७ दुग्धसंस्था डबघाइस आहेत. परंतू आता दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात येणारअसून, या प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायच्या विशेष प्रकल्प उभारणीमध्ये बुलडाण्यासह अकोला, अमरावती, वर्धा नागपूर, यवतमाळ, लातुर, नांदेड, जालना व उस्मानाबाद अशा दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.मात्र, यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वीच सहकारी दुध संघाचे कार्य सुरू असल्याने यवतमाळ जिल्ह्याचा या प्रकल्पात समावेश न करता चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प सन २०१७ ते २०२० या कालावधीत राबविला जाणार असल्याचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने २१ जानेवारी रोजी घेतला आहे. दूध उत्पादन वृद्धीसाठी कृत्रिम रेतनाच्या सुविधा घरपोच पुरविणे, संतुलित पशूखाद्या पुरवठा, पशुखाद्य विकास कार्यक्रम, जनावरांचे वाटप, गावपातळीवर पशुचिकित्सालय सेवा इत्यादी बाबी प्रकल्प संचालकांमार्फत राबविण्यात येणार आहेत. संस्थात्मक उभारणी कार्यक्रम गाव पातळीवरील दूध उत्पादक संघटना, दूध उत्पादकांच्या अतिरिक्त दुधाचे संकलन, दूध उत्पादकांमध्येजागरुकता व मनुष्यबळ प्रशिक्षण आदी बाबी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व त्यांच्या उपकंपन्यामार्फत राबविण्यात येतील. जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ होईल.प्रकल्प व्यवस्थापन समितीची स्थापनाविदर्भ व मराठवाडा विभागात विशेष दूध उत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यासाठी दूध उत्पादन प्रकल्पाकरिता प्रकल्प व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. १० अधिकाऱ्यांच्या या समितीमध्ये प्रधान सचिव कृषी हे अध्यक्ष तर प्रकल्प संचालक सचिव व इतर आठ सदस्यांचा समावेश आहे. या समिती अंतर्गत विशेष दूध उत्पादन प्रकल्पाचे कामकाज चालणार आहे.असे राबविणार कार्यक्रमकृत्रिम रेतनाच्या सुविधा घरपोच पुरविणे, संतुलित पशूखाद्य पुरवठा, जनावरांचे वाटप, गावपातळीवर पशुचिकित्सालय सेवा