शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इमारत दुर्घटनेचे १२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 08:07 IST

घाटकोपर (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गाजवळची ‘साई दर्शन’ ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.

मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गाजवळची ‘साई दर्शन’ ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत १२ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाने तातडीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तसेच दुर्घटनेची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तळमजल्यावर शिवसेना कार्यकर्त्याच्या ‘शीतप नर्सिंग होम’मध्ये नूतनीकरणात पिलर काढून टाकण्यात आला होता, इतर काम सुरू होते. अंतर्गत बदलामुळे ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे.११ जखमींपैकी वर्षा सकपाळ, गीता रामचंदानी यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात तर रिती खनचंदानी, प्रज्ञा बेन, गणेश तकडे यांच्यावर घाटकोपर येथील शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष नामदेव चव्हाण आणि विठ्ठल श्रीगिरी यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर प्रीतेश शहा, पारस अजमेरा, आॅल्डीकोस्ट डिमेलो आणि धर्मिष्ठ शहा यांच्यावर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. ‘साईदर्शन’ या इमारतीचे बांधकाम तळमजला अधिक चार करून सोडून देण्यात आले आहे. तर प्रीतेश शहा, पारस अजमेरा, आॅल्डीकोस्ट डिमेलो आणि धर्मिष्ठ शहा यांच्यावर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.‘साईदर्शन’ या इमारतीचे बांधकाम तळमजला अधिक चार मजले असे होते. प्रत्येक मजल्यावर तीन घर याप्रमाणे संपूर्ण इमारतीत पंधरा घरे होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलातर्फे चौदा फायर इंजिन, दोन रेस्क्यू व्हॅनसह आवश्यक कर्मचारी-अधिकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाला. दुर्घटना घडली तेव्हा सुरुवातीला अंदाजे ३० ते ३५ जण ढिगाºयाखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत वरिष्ठ अधिकारी व एन विभागातील कामगार, अभियंते, जेसीबी, डम्पर्स मदतीकरिता पाठविण्यात आले; शिवाय अधिक मदतीकरिता एम/पूर्व आणि एस, टी विभागांतूनही कामगार, जेसीबी, डम्पर्स घटनास्थळी पाठविण्यात आले. एकूण चार जेसीबी, सहा डम्पर्स, एक पोकलेन व तीनशे कामगार घटनास्थळी कार्यरत होते, तसेच नऊ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. नंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे ५० अधिकारी आणि जवान घटनास्थळी मदतकार्यात सहभागी झाले आहेत.——-मुखमहानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी उपायुक्त चंद्रशेखर चोरे व अभियांत्रिकी विभागातील प्रभारी संचालक विनोद चिठोरे यांची चौकशी समिती नेमली आहे.स्ट्रक्चरलआॅडिट नाहीच३६ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला बांधकाम स्थैर्यता प्रमाणपत्र नव्हते. नियमानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे बंधनकारकआहे. मात्र या इमारतीचे आॅडिट करण्यात आले नव्हते व तशी नोटीसही पालिकेने दिली नव्हती, असे स्थानिकांनी सांगितले.चौकशीचा देखावा होतोयअशा इमारती पडल्या, की चौकशी समित्या नेमण्यात येतात. त्यामधून काहीही कारवाई होत नाही. बड्या अधिकाºयांना क्लीनचीट देण्यात येते. यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी बड्या अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात सहाय्यक आयुक्त दोषी असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.-यशवंत जाधव, सभागृह नेतेदोषींवर कारवाई करणार : ही इमारत बेकायदेशीर नव्हती. मात्र नर्सिंग होमने नूतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती. हे नर्सिंग होम शिवसेनेचे सुनील शीतप यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल.-प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्रीशिवसेना अडचणीत, सारवासारव सुरूशिवसेनेचे कार्यकर्ते सुनील शीतप यांचे या इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होम आहे. नूतनीकरणाच्या कामाचा त्रास होत असल्याची तक्रार रहिवाशांनी वारंवार करूनही ठेकेदाराने काम सुरूच ठेवले. त्यामुळे हे प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने आपला बचाव सुरू केला आहे.या प्रकरणी कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणताही अधिकारी दोषी असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. मृतांची नावे : व्ही. रेणुका ललित ठक (३ महिने) या बालिकेसह रंजनाबेन भूपतीभाई शहा (६२), सुलक्षणा खनचंदानी (८०), मनसुखभाई गज्जर (८५), अमृता ठक (४०), दिव्या अजमेरा (४५), पंढरीनाथ डोंगरे (७५), मनोरमा डोंगरे (७०), क्रिश डोंगरे (१३ महिने), रितवी प्रीतेश शहा (१४), किशोर खनचंदानी (५०) व मिखुल खनचंदानी (३०).साईदर्शन इमारतीच्या तळमजल्यावरील प्रसूतिगृहात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाला पालिकेच्या विभाग कार्यालयाची कोणतीही परवानगी नव्हती, असे समोर आले आहे. या बेकायदा नूतनीकरणात इमारतीचा पिलरच तोडण्यात आला, असेही समजते. घाटकोपर पश्चिम येथील दामोदर पार्क परिसरातील साईदर्शन ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. तळमजल्यावरील नर्सिंग होममध्ये नूतनीकरणाचे काम काही दिवसांपासूनसुरू होते. या कामासाठी मात्र पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली. - आणखी वृत्त/२सुनील शीतप पोलिसांच्या ताब्यातनर्सिंग होमचा मालक सुनील शीतपसहअन्य साथीदारांवरपार्क साईट पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यातआला आहे. शीतपला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली.