शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा विरोधी पक्षनेत्यांविनाच, सरकारचा पेपर सोपा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 06:23 IST

Maharashtra Budget Session 2026: १५ व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर २०२४ मध्ये पार पडले. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होते.

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याची कमतरता जाणवणार आहे.संख्याबळाचे कारण देत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीला मान्यता दिलेली नसून नजीकच्या काळातही याबाबत निर्णय होण्याची शक्यता नाही.

सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याने तसेच नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्याने विरोधक हतबल असल्याचे चित्र असेल. त्यामुळे सरकारसाठी हे अधिवेशन सोपे जाणार आहे. 

१५ व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर २०२४ मध्ये पार पडले. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होते. मात्र, संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित आहे.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अभ्यास सुरू- नार्वेकर

राज्य विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले होते. 

त्यांनी घेतलेला निर्णय सरकारला मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदाबाबत सरकारचा कोणताही दुराग्रह नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियमांचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले होते.

विरोधी पक्षनेत्यांच्या सदस्य निवडीच्या पत्रांकडे दुर्लक्ष

विधानसभेत उद्धवसेनेचे २० आमदार आहेत. उद्धवसेनेतर्फे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र ४ मार्च २०२५ रोजी देण्यात आले. याला आता एक वर्षपूर्ण होतील.    उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत गेल्यावर्षी ऑसंपली. त्यामुळे काँग्रेसने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना डिसेंबर २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या निवडीचे पत्र दिले होते. या दोन्ही पत्रावर कार्यवाही झालेली नाही.

मुनगंटीवार यांच्या भूमिकेकडे लक्ष मागील दोन अधिवेशने भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिवेशनात ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.

अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

राज्याचा २०२६-२७ चार अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी आल्याने फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Budget Session Begins Without Opposition Leaders; Easier for Government.

Web Summary : Maharashtra's budget session starts without opposition leaders in both houses. The government gains advantage due to opposition disarray and recent election successes. Devendra Fadnavis will present the budget on March 6th, following Ajit Pawar's passing.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकर