शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ‘मनोरा’चे बजेट १००० कोटी, मुख्यमंत्र्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:24 IST

‘मनोरा’ आमदार निवास नव्याने बांधले जाणार असून, त्याचे बजेट १००० कोटींचे आहे. ४५ माळ्यांचा हा टॉवर मुंबईच्या समुद्रकिना-यावरील पहिली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणार आहे.

- राजेश निस्तानेमुंबई - ‘मनोरा’ आमदार निवास नव्याने बांधले जाणार असून, त्याचे बजेट १००० कोटींचे आहे. ४५ माळ्यांचा हा टॉवर मुंबईच्या समुद्रकिना-यावरील पहिली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणार आहे.राज्य सरकार लवकरच कामाचा नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत ‘एमओयू’ करणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळ अध्यक्ष, सभापतींच्या उपस्थितीत आढावा घेतला.सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांची नाराजी तर नाही ना, असा सूरही ऐकायला मिळाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या याच बैठकीत ‘मनोरा’ची नवीन इमारत नेमी कशाप्रकारची असेल, याचे प्रेझेन्टेशन मुंबईतील एका नामांकित आर्किटेक्चरने सादर केले. ‘पुणे कनेक्शन’मधून त्या आर्किटेक्चरवर ‘प्रभू’कृपा होण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.शुल्कासाठी ओढाताण‘मनोरा’ बांधकाम प्रक्रिया व अंमलबजावणीपोटी ‘एनबीसीसी’ ६.२५ टक्के शुल्क घेणार आहे. त्यातून आर्किटेक्चरलाही शुल्क दिले जाणार आहे. मात्र, ते किती असावे, यावर एकमत झालेले नाही. या शुल्कावरून ‘एनबीसीसी’ व आर्किटेक्चर यांच्यात टक्केवारीची ओढाताण सुरू असली, तरी ते २० कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.परवानगीसाठी कसरतमुंबईतील समुद्रकिनारी तब्बल ४५ माळ्यांची नवी ‘मनोरा’ ही पहिलीच इमारत असेल. त्यामुळे त्याला विविध परवानग्या मिळविण्याचे आव्हान ‘एनबीसीसी’ पुढे राहणार आहे.या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्यक्ष बांधकामाला किमान चार वर्षे लागतील, अशी शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार