शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023 : शेतीवर फक्त घाेषणांचा पाऊस, ठोस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:44 IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे.

-राजू शेट्टी( स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)

केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे. सेंद्रिय शेतीने जर प्रश्न सुटले असते तर  या देशात हरितक्रांतीचा पर्याय अवलंबला गेला नसता. हरितक्रांतीपूर्वी देशात सेंद्रिय शेती केली जात हाेती. हरितक्रांती का करावी लागली. रासायनिक खते, हायब्रीड बियाणे का आणावी लागली? याचाही विचार हाेणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचा परिणाम ऊस उत्पादक व सर्व शेतकऱ्यांवर झालेला आहे. यावर्षी उसाचे एकरी उत्पादन ५ ते ७ टनांनी कमी झाले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे उसाची उत्पादकता कमी झाली आहे. वाढत्या खतांच्या किंमतीचा परिणाम सर्व पिकांवर हाेऊ शकताे. या अर्थसंकल्पात ना प्रक्रिया उद्याेगाला चालना दिली, ना बाजारपेठ विकसित हाेण्यासाठी प्रयत्न केले गेले. पायाभुत सुविधांसाठी प्रयत्न हाेताना दिसत नाहीत. या अर्थसंकल्पात फक्त घाेषणांचा पाऊस झाला आहे. यापूर्वीही अशा अनेक घाेषणा झाल्या आहेत. सरकार २०२२मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार हाेते. उत्पन्न काही दुप्पट झाले नाही. मात्र, खतांच्या किमती दुप्पट झाल्या. २०१४मध्ये उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार हाेते. ताे काही दिला नाही. मात्र, उत्पादन खर्च दीडपट झाला आहे. 

बाजरी, भरड धान्याचे हब करण्याची कल्पना चांगली आहे. अख्खा जगाला भरड धान्य पुरवण्याची क्षमता आपल्या देशात आहे. पण त्यासाठी जिराईत शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. सर्व पिकांना हमीभाव अनिवार्य करणारा कायदा संसदेने मंजूर केला पाहिजे. यावर सरकार काहीच करताना दिसत नाही. यामुळे या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या हातात काहीही पडलेले नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरी