शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 05:01 IST

विदर्भातील प्रकल्पांना भरघोस निधी; बडनेरा वर्कशॉपसाठी १५१.६३ कोटी

- दयानंद पाईकराव/आनंद शर्मा नागपूर : अर्थ आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वेमार्गासाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी ‘लोकमत एडिटोरियल बोर्डा’चे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाशिवाय बडनेरातील रेल्वे वर्कशॉपसाठी १५१ कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये देण्यात आले आहेत. ७८.७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर चौथ्या लाइनसाठी १३५ कोटी रुपये, ७६.३ किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर थर्ड लाइनसाठी ११० कोटी, १३२ किलोमीटर लांबीच्या वर्धा-बल्लारशाह थर्ड लाइनसाठी १६० कोटी रुपये, इटारसी-नागपूर थर्ड लाइनसाठी १८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात अमरावती रेल्वे स्थानकावर नवी टर्मिनल इमारत तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून प्राथमिक स्तरावर त्यासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १६५ किलोमीटर लांबीच्या राजनांदगाव-नागपूर थर्ड लाइनच्या कामासाठी ३५० कोटी रुपये, १४९.५२ किलोमीटर लांबीच्या छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाइनसाठी १२५ कोटी रुपयेमिळाले आहेत. ४९.५ किलोमीटर लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी २९.९० कोटी रुपये देण्यात आले. गोंदिया-जबलपूर (बालाघाट, कटंगीसह) रेल्वेमार्गासाठी १२५ कोटी रुपये, छिंदवाडा-मंडला फोर्ट रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपये, गोंदिया येथील डेमू शेडसाठी १.१६ कोटी, वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्मवर वॉशेबल अ‍ॅप्रानसाठी ५० लाख रुपये, तिगाव-चिचोंडा थर्ड घाट लाइनसाठी ३५ कोटी रुपये, वर्धा-चितोडा सेकंड कॉर्ड लाइनसाठी १ कोटी रुपये, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ५० रेल्वे गेटवर रिमोट टर्मिनल व ईएलडी इक्विपमेंट सिस्टीमसाठी ४ कोटी रुपये, १५ रेल्वे गेटवर इंटरलॉकिंगसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019railwayरेल्वेYavatmalयवतमाळNandedनांदेड