शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

बुद्धधम्म थायलंड-भारतातील दुवा

By admin | Updated: October 5, 2014 01:02 IST

थायलंड आणि भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. या दोन्ही राष्ट्राला जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे बुद्ध धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधील दुवा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील मेजर जनरल

धम्मचक्र प्रवर्तनदिन : मेजर जनरल थनसक पूमपेच यांचे प्रतिपादन नागपूर : थायलंड आणि भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. या दोन्ही राष्ट्राला जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे बुद्ध धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधील दुवा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील मेजर जनरल थनसक पूमपेच यांनी शुक्रवारी दीक्षाभूमी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडमधील ज्येष्ठ पत्रकार डॉ. रंगथीप छोटनापलाई, महापौर प्रवीण दटके, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती हर्षदीप कांबळे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, अ‍ॅड आनंद फुलझेले, विजय चिकाटे , प्राचार्य डॉ. प्रकाश खरात, मालती रेड्डी आदी उपस्थित होते. मेजर जनरल पूमपेच पुढे म्हणाले, थायलंड हे एक बुद्धिस्ट राष्ट्र आहे. त्यामुळे तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या भारतात झाला त्या राष्ट्राबद्दल आम्हाला अतिव आदर आहे.भारतासोबत थायलंडचे संबंध प्राचीन काळापासूनचे मैत्रीचे राहिले असून यापुढेही मैत्रीचेच संबंध राहतील, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.डॉ. रंगथीप छोटनापलाई म्हणाल्या, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला केवळ धम्मच दिला नाही, तर जीवन जगण्याचा एक मंत्र दिला आहे.. महापौर प्रवीण दटके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अथक परिश्रमातून दीक्षाभूमी उभी झाली आहे. यापुढेसुद्धा महापालिका स्मारक समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. संचालन व अनुवाद डॉ. एस. के. गजभिये यांनी केले. (प्रतिनिधी)