शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बीटी कपाशीच्या पेरणीचे दिवस गेले!

By admin | Updated: July 11, 2014 00:32 IST

आता मूग, उडीद, मटकी आणि चवळीसोबतच बीटी कपाशीचे खरिपातील नगदी पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले आहे.

अकोला: जुलैचा पंधरवडा आला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने आता मूग, उडीद, मटकी आणि चवळीसोबतच बीटी कपाशीचे खरिपातील नगदी पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले आहे. १५ जुलैपर्यंंत पाऊस येईल, अशी कृषी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे. असे असले तरी, अनेक शेतकर्‍यांनी आता अर्धरब्बी पिकांचे नियोजन करणे सुरू केले आहे. साधारणत: जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येतो. ते गृहित धरून शेतकर्‍यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या; तथापि गत दहा वर्षांंत कधी नव्हे एवढा पावसाला विलंब झाला. विदर्भातील शेतकर्‍यांनी महागडे बी-बियाणे खरेदी केले असून, या शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु पावसाचा थांगपत्ता नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीचा विचार करता, अनेक शेतकर्‍यांनी आता कापूस, सोयाबीन, बाजरी, ज्वारीचे बियाणे पुढील वर्षी पेरण्याचा निर्णय घेतला असून, त्याजागी अर्धरब्बी म्हणजेच तीळ, सुर्यफूल, करडई व तूर या पिकांचे नियोजन करणे सुरू केले आहे. दरम्यान, बीटी व संकरित कापूस, सोयाबीन या खरिपातील पिकांच्या पेरणीचा सामान्य कालावधी निघून गेला आहे. आता १५ जुलैपर्यंंत पाऊस आल्यास कापूस पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीनच कपाशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकर्‍यांना बियाणे पेरणीतील अंतर कमी करावे लागणार आहे. लवकर परिपक्व होणारे अमेरिकन अथवा देशी कापसाचा वापर केल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सलग सोयाबीन पिकासाठी कृषि विद्यापिठांच्या शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन अधिक तूर असे आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होईल. धान रोवणी करणार्‍या शेतकर्‍यांना शिफारशीप्रमाणे रोवणी करावी लागणार असून, साकोली-६, पिकेव्ही मकरंद, पिकेव्ही गणेश, पिकेव्ही एचएमटी, सिंदेवाही २00१ या वाणांची निवड केल्यास फायदेशीर ठरणार आहे.