शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्रेते हायकोर्टात

By admin | Updated: April 5, 2017 05:48 IST

महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत येणाऱ्या वाईन शॉप्स व बारच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

नागपूर : महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत येणाऱ्या वाईन शॉप्स व बारच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशामुळे प्रभावित पुसद (यवतमाळ) येथील मद्यविक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.मेसर्स के. के. ट्रेडर्स, ए. बी. जयस्वाल वाईन शॉप, शारदाबाई जयस्वाल, मेसर्स बी. एम. जयस्वाल व मेसर्स समर्थ ट्रेडर्स यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश असून पुसद शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गांवर त्यांचे वाईन शॉप्स आहेत. ९ मार्च २००१ रोजीच्या ‘जीआर’नुसार बायपास रोडचे काम पूर्ण होताच शहरातून जाणारा राज्य महामार्ग तत्काळ नगर परिषद किंवा महानगरपालिकेला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. २००१ मध्ये पुसद-उमरखेड बायपास महामार्ग बांधल्यानंतर शहरातून जाणारा राज्य महामार्ग ८ जानेवारी २००३ रोजी नगर परिषदेला हस्तांतरित केला. परंतु, वर्गवारी बदलली नसल्यामुळे हा रोड अद्यापही महामार्गामध्ये मोडतो. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंत्यांनी महामार्गाची वर्गवारी बदलण्याकरिता प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी नगर परिषदेचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. परंतु, राजकीय दबावामुळे मुख्याधिकारी प्रतिज्ञापत्र देणे टाळत आहेत. परिणामी याचिकाकर्त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.न्यायमूर्ती भूषण गवई व अतुल चांदूरकर यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याच्या अबकारी विभागाचे सचिव, यवतमाळ जिल्हाधिकारी, अबकारी अधीक्षक, अदींना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)