शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

थंडी संपल्यावर मिळणार स्वेटरची ऊब!

By admin | Updated: January 5, 2016 03:25 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करता यावा यासाठी आदिवासी विकास खात्याने स्वेटर खरदी करण्याचा निर्णय घेतला खरा;

यदु जोशी, मुंबईआदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करता यावा यासाठी आदिवासी विकास खात्याने स्वेटर खरदी करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु हे स्वेटर्स हिवाळा संपत आल्यानंतर मिळणार आहेत. शिवाय, या स्वेटरच्या एका नगासाठी मायबाप सरकारने चक्क २१०० रुपये मोजले असल्याने स्वेटरची ‘ऊब’ नेमकी कोणाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर पुरविण्याची निविदा सुमारे अडीच महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती. सप्टेंबरपासून हे स्वेटर पुरविण्यात येणार होते. मात्र, अजूनही ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. स्वेटर पुरवठ्यास विलंब झाल्याची कबुली स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. स्वेटरच्या खरेदीचा प्रस्ताव नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयातून मंत्रालयात पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ३०० रुपयांना एक या प्रमाणे २ लाख विद्यार्थ्यांना ६ कोटी रुपयांत स्वेटर मिळाले असते; पण आता त्यापोटी ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या स्वेटरची निविदा प्रक्रिया ज्या पद्धतीने राबविण्यात आली ती बघता काही विशिष्ट कंत्राटदारांनाच फायदा पोहोचविण्याचा उद्देश होता, अशी शंका मंत्री सावरा यांच्याकडे एका लेखी तक्रारीत घेण्यात आली आहे. मधुकरराव पिचड या विभागाचे मंत्री असताना शालेय सामुग्रीच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यामागे रोख पैसे देण्यात आले होते. ही पद्धत अवलंबिली असती तरी विद्यार्थ्यांना फायदा झाला असता, असे आता म्हटले जात आहे. 300 रुपये दरात आजवर आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना ६५ टक्के वूलन आणि ३५ टक्के कॉटन असलेले स्वेटरचा पुरवठा केले जात असत. मात्र, यावेळी फतवा निघाला की १०० टक्के वूलनचे स्वेटर द्यायचे. ज्या निविदा आल्या त्यात १४०० ते २१०० रुपये प्रति स्वेटरप्रमाणे किमती नमूद करण्यात आल्या आहेत.साधारणत: एक महिन्यात सर्व विद्यार्थ्यांना स्वेटरचा पुरवठा केला जाईल. विलंब झाला हे खरे आहे. तीन-चार दिवसांत कार्यादेश देऊ. स्वेटर महागाचे आहे; कारण ते १०० टक्के वूलनचे व दर्जेदार असेल. - विष्णू सावरा, आदिवासी विकास मंत्रीलाखो आदिवासी मुलांना शालेय साहित्यापासून वंचित ठेवून त्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. सर्व प्रकारच्या साहित्याच्या खरेदीत जो अक्षम्य विलंब झाला त्याची सीबीआय चौकशी करा. विष्णू सावरा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. - मधुकरराव पिचडमाजी आदिवासी विकास मंत्री