शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019 : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 17:14 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय आपल्यासमोर चर्चिलाच गेला नव्हता. तसेच अशाप्रकारचे कुठलेली आश्वासन शिवसेनेला दिले गेले नव्हते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

शिवसेनेशी युती करताना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कुठलेही आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातून शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. दरम्यान, आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटपावरून निर्माण झालेला तिढा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबतचे आश्वासन याबाबत मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या. त्यापैकी १०५ जागा एकट्या भाजपाला मिळाल्या होत्या. दुर्दैवाने आमच्या काही जागा कमी आल्या. त्याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करण्याबाबत आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांचे हे विधान आमच्यासाठी धक्कादायक होते. जनतेने महायुतीला मतदान केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे  असे का म्हणाले असावेत असा प्रश्न आम्हाला पडला.''''अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर अशाप्रकारचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर चर्चिला गेला नव्हता. तसेच युतीची घोषणा करतानाही याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये असे आश्वासन दिले गेले असावे, असे आम्हाला वाटले. म्हणून अमित शाह यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनीही अशाप्रकारचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले,'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना