शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 12:36 IST

'नवाब मलिकांना सध्या काही काम नाही, त्यांच्या प्रत्येक विधानावर लक्ष देण्याची गरज नाही.'

नागपूर: गोवा ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरण सुरू झाल्यापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय, नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.

काय म्हणाले होते नवाब मलिक?नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्यासह भाजपवरही टीका केलीये. 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील, माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता मी काही बोलणार नाही, मला विषयांतर करायचे नाही. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार, असं नवाब मलिक म्हणाले होते. 

भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाहीभाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडे यांची भेट घेत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनामघ्ये मी त्या नेत्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यानंतर या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होणार आहे. महिन्याभरापूर्वी परिस्थिती निराळी होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे वानखेडेंची भेट घेत आहेत. काशिफ खान याला अटक केल्यानंतर अनेकांची पोलखोल होईल. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहेत हे उघड होईल. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी होईल, असंही मलिक म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो