शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या वानराकडून बाटलीतलं पाणी क्षणात फस्त

By admin | Updated: April 16, 2017 20:04 IST

साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क 41 अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क 41 अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली येथील जंगलात पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. एका वानराने चक्क पर्यटकाने टाकलेल्या खाद्यपदार्थांकडे न पाहता पाण्याची अख्खी बाटली काही क्षणात पिऊन रिकामी केली.सातारा शहराच्या पश्चिमेकडील भाग हा जास्त पर्जन्याचा म्हणून ओळखला जातो. तसेच येथील वनसंपदाही समृद्ध आहे. कित्येक पशुपक्ष्यांचा वावर या परिसरात आहे. परंतु यंदाच्या हंगामातील उच्चाकी 41 अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्मा तयार होत आहे. अंगाला उन्हाचे चटके बसत असताना ठिकठिकाणी भूगर्भातील पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भाग अतिवृष्टीचा असला तरी तीव्र डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी भूगर्भात न मुरता मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. बहुतांशी ठिकाणी असणारे तळी, झरे, पाणवठ्यावरील पाण्याचे प्रमाण अत्यल्प होत असून, काही ठिकाणी पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.परिसरात झाडाझुडपांचा निवारा तसेच तोरणे, अंबुळगी, करवंदी, आळू, जांभळे हा रानमेवा पशुपक्ष्यांची भूक भागवत असला तरी पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना तहान भागवणे अवघड झाले आहे. हे वास्तव भीषण चित्र या वानराकडे पाहिल्यावर लक्षात येते. खाद्यपदार्थ समोर ठेवला असतानाही त्याकडे न पाहता मिळालेल्या बाटलीतील पाणी गटागटा पिऊन पाण्याची बाटली काही मिनिटांतच रिकामी केली. या वानराला किती दिवसांची तहान लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नाच्या शोधात भटकंती करणाऱ्या पशुपक्ष्यांना आसपास पाणी न मिळाल्यास जिवाची तडफड होते. कित्येक जिवांना प्रसंगी जीवही गमवावा लागत असावा. ही समस्या जाणून त्यांच्या भावना ओळखून शक्य असेल त्या ठिकाणी अनेकविध उपक्रमांतून काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सर्वांवर येऊन पडते. काही पर्यटकांनी रानमेव्याच्या शोधात त्यांची गाडी रस्त्यानजीक लावली असता झाडावर बसलेल्या वानरसेनेतील काही वानरं गाडीनजीक घुटमळू लागली. दरम्यान, खाऊचा पदार्थ समोर दिला असता वानर पदार्थाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यातील एक जण पाण्याचा घोट घेत असताना वानराचे पूर्ण लक्ष त्या पाण्याच्या बाटलीकडे होते. बहुतेक पाणी हवे असावे, ही त्या वानराची भावना ओळखून त्याच्या समोर पाण्याची बाटली ठेवली असता, कशाचीही भीती न बाळगता वानराने बाटली तोंडाला लावली अन् काही मिनिटांतच रिकामी केली. तहानेने व्याकूळ झाल्यानंतर पाणी प्यायला मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव काही वेगळेच सांगून जात होते.