शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

दोघांनी छोट्या मुलाला स्कूटीने घरी आणले होते

By admin | Updated: January 16, 2015 01:04 IST

राजेश आणि त्याचा मित्र एका छोट्या मुलाला घेऊन स्कूटीने घरी आले होते आणि तडक ते त्याला मोटरसायकलने घेऊन गेले, अशी साक्ष आपल्या अडीच महिन्याच्या मुलासह आलेल्या

न्यायालय : अडीच महिन्याच्या मुलासह आलेल्या ‘मामी’ ची साक्षनागपूर : राजेश आणि त्याचा मित्र एका छोट्या मुलाला घेऊन स्कूटीने घरी आले होते आणि तडक ते त्याला मोटरसायकलने घेऊन गेले, अशी साक्ष आपल्या अडीच महिन्याच्या मुलासह आलेल्या एका महिलेने युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली. रुपाली दिनेश कनसरे, असे या महिलेचे नाव आहे. आपली सरतपासणी साक्ष देताना ही महिला म्हणाली, मी न्यायालयात हजर असलेल्या राजेशला ओळखते. त्याचे कुटुंब माझे शेजारी आहेत. राजेशच्या आईचे नाव भूमेश्वरी आणि भावाचे नाव अंकुश आहे. ते मला ‘मामी’ म्हणतात. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली. त्या दिवशी मी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात कपडे धूत होती. त्यावेळी राजेश हा आपल्या एका मित्राला घेऊन आपल्या स्कूटीने आला होता. स्कूटीवर त्यांच्या मधात एक पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा बसलेला होता. राजेश हा स्कूटी चालवीत होता. त्याने लाकडी कंपाऊंड गेटला धडक मारली होती. त्यामुळे त्यांच्याकडे माझे लक्ष गेले होते. ‘जर तू अशा तऱ्हेने गाडी चालवली तर तो छोटा मुलगा जखमी होईल’, असे आपण त्याला म्हटले होते. अंगणातील झाडेझुडपांमुळे आपण स्कूटीवरील मुलाचे कपडे पाहू शकलो नव्हतो. तो लहान मुलगा कोण, असे आपण राजेशला विचारले होते. तो आपल्या मित्राचा भाऊ असल्याचे त्याने सांगितले होते. ही महिला साक्ष देताना पुढे म्हणाली, राजेशने आपली स्कूटी अंगणात उभी केली होती. त्यानंतर तिघेही मोटरसायकलने निघून गेले. मी घटनेच्या वेळी राजेशसोबत असलेल्या त्याच्या मित्राला ओळखू शकते. साक्षीदार महिलेने न्यायालयात हजर असलेल्या अरविंदसिंगला ओळखले. बचाव पक्षाच्या वकिलाने घेतलेल्या उलट तपासणी साक्षीत ही महिला म्हणाली , हे खरे आहे की, मी १ सप्टेंबर रोजी आजारी असल्याने इस्पितळात गेली होती. डॉक्टरने औषध देऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. हे म्हणणे खरे नाही की, मी सायंकाळी स्वयंपाकाच्याच वेळी झोपेतून उठली. ही महिला स्वत:हून म्हणाली की, मी कपडे धुण्याकरिता सायंकाळी सुमारे ४.३० उठली होती. न्यायालयात डॉ. चांडक क्लिनिकचा कर्मचारी धर्मेंद्र यादव आणि प्रशांत जयकुमार यांचीही साक्ष झाली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. जयश्री वासनिक यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)चिमुकले मातेविना होते अर्धा तासरुपाली कानसरे ‘मामी’ ही आपल्या अडीच महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन साक्ष देण्यास साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आली होती. तुमचे पतीसोबत नाही काय, असे विचारण्यात आले असता तिने एकटीच आल्याचे सांगितले. त्यामुळे चिमुकल्याला कसे सांभाळायचे, असा क्षणिक प्रश्न निर्माण झाला. तडक एक महिला पोलीस शिपाई पुढे आली आणि तिने चिमुकल्याला आपल्या कवेत धरले. साक्ष पूर्ण होईपर्यंत तब्बल अर्धा तास हे चिमुकले मातेविना होते आणि महिला पोलिसाच्या कवेत शांत झोपले होते.