शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"दोन्ही रेकॉर्डरचे आगीमुळे नुकसान..."; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:25 IST

२८ जानेवारी रोजी बारामती येथे कोसळलेल्या लिअरजेट ४५ च्या दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्सना तीव्र उष्णतेमुळे गंभीर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. ज्या देशात हे विमान बनवण्यात आले त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून याबाबत माहिती मागवण्यात येत आहे अशी माहिती एअर एक्सिडेंट ब्यूरोने दिली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे सांगण्यात येत होते. विमान अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा यापद्धतीने त्याची रचना केलेली असते मात्र आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत निवेदन करण्यात आले आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे.  अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले. परंतु एल३-कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) AAIB फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला असं सांगितले आहे.

तसेच या रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीसाठी आता ज्याठिकाणी विमानाचे उत्पादन केले त्या देशाच्या अधिकृत प्रतिनिधीकडून मदत मागण्यात आली आहे. कॉकपिट रेकॉर्डरची निर्मिती हनीबेल कंपनीकडून करण्यात आली आहे. त्याबाबत डिटेल्स परिक्षण सुरू आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे कोसळलेल्या लिअरजेट ४५ च्या दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्सना तीव्र उष्णतेमुळे गंभीर नुकसान झाले, ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांनी कॉकपिट ऑडिओ डेटा रिकव्हर करण्यासाठी विशेष परदेशी मदत घेणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताबाबत १०० टक्के संशयाला जागा आहे. ब्लॅक बॉक्स हा विमानाची कितीही वाईटातील वाईट दुर्घटना झाली तरी त्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा असतो. आता ब्लॅक बॉक्स बंद पडला असेल तर रोहित पवारांनी जी पाऊले उचलली आहेत ती योग्य आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली आहे. या प्रकरणात सरकार संशयास्पद भूमिका घेतेय. सरकार यंत्रणांना पाठीशी घालत असल्याचे सकृत दर्शनी दिसते असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane accident: Recorders damaged by fire, investigation ongoing.

Web Summary : Both recorders in Ajit Pawar's plane crash were damaged by fire. Data recovery efforts are underway with international assistance. The recorders sustained high-temperature damage. Suspicion surrounds the accident, demanding impartial inquiry, says Ambadas Danve.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना