शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत जन्मले दुर्मीळ अक्रॉनियाग्रस्त बाळ; २० तासात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:15 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला.

- प्रतिक मुधोळकर

अहेरी (गडचिरोली) : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत अशा बाळाला अक्रॉनियाग्रस्त असे म्हणतात. अशा बाळाचा जन्म क्वचितच होत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.अक्रॉनियाग्रस्त बाळाच्या मेंदूवर कवटी नसते. तसेच कोणत्याही प्रकारच्या त्वचेचेसुद्धा आवरण नसते. मेंदू हवेच्या सरळ संपर्कात येत असतो. त्यामुळे बाळाचा मृत्यू अटळ असतो. हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेचे सचिव शंकर मगडीवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात त्या महिलेला भरती केल्यानंतर अधीक्षक डॉ.कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अनंत जाधव व महिला अधिपरीचारिकांनी सदर महिलेची प्रसूती केली. बाळास वाचविण्याचे प्रयत्न केले, मात्र २० तासानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला.याआधी २ महिन्यांपूर्वी अश्याच प्रकाराचे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मास आले होते, मात्र काही प्रमाणात त्याचा मेंदू झाकल्या गेला होता. अद्याप त्याची प्रकृती स्थिर आहे. गरोदर मातांनी असले प्रकार टाळण्यासाठी व सुदृढ बाळास जन्म देण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक असून सकस व योग्य आहार, रक्तवाढीच्या गोळ्या आणि वेळोवेळी सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितले.

अशा बाळाचा जन्म का होतो?

सहसा अनेक गरोदर महिला गरोदरपणाच्या काळात डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही सोनोग्राफी करत नाही. त्यामुळे बाळाची वाढ कशी होत आहे हे कळत नाही. वैद्यकीय सूत्रानुसार, रक्ताची कमतरता आणि मातेने योग्य व सकस आहार न घेतल्यास बाळाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. परिणामी असे बाळ जन्मास येऊन त्यांचा मृत्यू होतो. गरोदरपणात नियमित सोनोग्राफी केल्यास बाळाची वाढ दिसून येते. फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या आणि सकस, योग्य आहार घेतल्यास बाळाची वाढ योग्य प्रकारे होऊन सुदृढ बाळ जन्मास येऊ शकते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhospitalहॉस्पिटल